बासुंदी



साहित्य:

३ लिटर म्हशीचे दुध
३ वाट्या साखर
१/२ जायफळ-वेलची पूड
२-३ टेबलस्पून दुधाचा मसाला
सजावटीसाठी पिस्ता व बदामाचे काप

कृती:

१) एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत ३ लिटर दुध मध्यम आंचेवर तापत ठेवा. दुध उकळल्यावर त्यात साखर घालून दुध आटवून घ्या. ३ लिटर दुधाचे २ ते अडीच लिटर होईपर्यंत आटवा.

२) तयार बासुंदीमध्ये जायफळ-वेलची पूड व दुध मसाला घालून मध्यम आंचेवर उकळवा. गार झाल्यावर फ्रिझमध्ये ठेवा.

३) पिस्ता व बदामाचे काप घालून सर्व्ह करा. आवडत असल्यास बासुंदीत चारोळ्या घाला.)

Comments

Popular Posts