मेथांबा
कैरी पासून तयार केला जाणारा आंबट गोड चवीचा महाराष्ट्रीयन पदार्थ - 'मेथांबा '
साहित्य:
- २ वाट्या सालं काढून बारीक चिरलेली कैरी
- एक ते दिड वाटी चिरलेला गूळ
- १/२ टीस्पून मेथीदाणे
- १/४ टीस्पून लाल तिखट
- थोडासा हिंग
- १ टेबलस्पून तेल
- थोडेसे मीठ
कृती:
१) एका भांड्यात तेल तापवून त्यात मेथी दाणे, हिंग, लाल तिखट व कैरीच्या फोडी घालाव्यात. त्यावर झाकण ठेवावे व झाकणावर पाणी ठेवावे. मंद आंचेवर कैरीच्या फोडी नीट शिजवून घ्या.
२) कैरी शिजल्यावर त्यात चिरलेला गूळ घालून मिश्रण एकत्र करून गुळ विरघळवून घ्या. (कैरी आंबट असल्यास गुळ जास्त घालावा.) थोडेसे मीठ घालून मिश्रण ढवळा. घट्टसर झाल्यावर गॅस बंद करा व सर्व्ह करा.
आंबट गोड चवीचा मेथांबा नक्कीच आवडेल.
Comments
Post a Comment