चिक्कू हलवा / चिक्कूच्या वड्या
साहित्य:
- ६ मोठे चिक्कू
- १/२ कप साखर
- अडीच टेबलस्पून रवा
- १५० ग्रॅम मावा (किसून)
- ५-६ काजूचे तुकडे
- आवश्यकतेनुसार साजूक तूप
- थोडीशी जायफळ पूड
कृती:
१) चिक्कू घेताना तयार पण थोडेसे कडक असावेत. चिक्कूची सालं व बिया काढून चिक्कू किसून/ मॅश करून घ्या.
२) एका पॅनमध्ये २ टीस्पून तुपावर रवा भाजुन घ्या. त्यात साखर व चिक्कू मॅश घालून मध्यम आंचेवर ठेवून एकाच दिशेने ढवळत रहा. आवश्यकतेनुसार तुप घाला. घट्टसर झाल्यावर त्यात किसलेला मावा घाला.(मावा मिक्सरच्या भांड्यात एकसारखा करून घातला तरी चालेल.) तयार मिश्रण घट्टसर होऊ द्या व गोळा झाला की, तुप लावलेल्या ताटलीत मिश्रण थापा व वड्या पाडा.
३) वरून काजूचे तुकडे घाला व सर्व्ह करा.
Comments
Post a Comment