फोडणीची पोळी.



बहुतेक वेळा शिळ्या पोळीपासून केला जाणारा महाराष्ट्रातील नाश्ता प्रकार. 'फोडणीच्या पोळी', 'पोळीचा कुस्करा', 'मनोहर ' अशा विविध नावाने ओळखला जातो. नेहमीच सगळ्यांकडे केली जाणारी व आवडणारी फोडणीची पोळी.

साहित्य:

  • ४-५ पोळ्या
  • १ मध्यम कांदा चिरलेला
  • १ लहान टोमॅटो चिरलेला
  • १-२ हिरव्या मिरच्या
  • ५-६ कढिपत्याची पानं
  • २-३ टेबलस्पून तेल
  • फोडणीसाठी थोडी मोहरी, हळद व चिमुटभर हिंग
  • १/४ टीस्पून साखर
  • थोडेसे मीठ
  • सजावटीसाठी तळलेले शेंगदाणे, लिंबू व चिरलेली कोथिंबीर

कृती:

१) पोळीचे तुकडे करून मिक्सरमध्ये पोळी कुस्करुन घ्या.

२) एका कढईत तेल तापवून त्यात शेंगदाणे तळा व बाजूला काढून ठेवा. मोहरी, हळद व हिंग घालून फोडणी करा. त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चिरलेला कांदा घालून १-२ मिनिटे परता. चिरलेला टोमॅटो घालून १-२ मिनिटे पुन्हा परता. कुस्करलेली पोळी, थोडी साखर व थोडेसे मीठ घालून मिश्रण २-३ मिनिटे परता.

३) लिंबाची फोड, चिरलेली कोथिंबीर व तळलेले शेंगदाणे घालून सजवा व गरमागरम सर्व्ह करा.

Comments

Popular Posts