डबल डेकर खांडवी/ Double Decker Khandavi

(नाचणीच्या रव्याच्या व तांदूळाच्या रव्याच्या खांडवीच्या वड्या)

साहित्य:

  • १ वाटी नाचणीचा रवा
  • १ वाटी तांदुळाचा रवा
  • २ वाट्या चिरलेला गूळ 
  • दिड वाटी खोवलेला नारळ 
  • १/२ टीस्पून वेलची पूड 
  • ४-५ वाट्या पाणी 
  • साजुक तुप आवश्यकतेनुसार 

कृती:


१) एका कढईत १ वाटी तांदुळ (वाडा कोलम) गुलाबीसर रंगावर भाजून घ्या नंतर त्यात १-२ थेंब साजूक तूप घालून पुन्हा थोडंसं भाजून घ्या. तांदुळ गार झाल्यावर मिक्सरमध्ये त्याचा रवा काढून ठेवा.

२) बाजारात नाचणीचा रवा विकत मिळतो.

३) प्रथम एका कढईत २ टीस्पून तुप घालून १ वाटी नाचणीचा रवा भाजुन घ्यावा. 
त्यात १/२ वाटी खोवलेला नारळ घालून मिश्रण परतून घ्या. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे तुप घालून रवा भाजुन घ्या.  छान भाजल्यावर त्यात २ वाट्या उकळीचे पाणी घालून रवा फुलवून घ्या. आवश्यकता वाटल्यास पुन्हा थोडे पाणी घाला. १ वाटी चिरलेला गूळ कढईत घालून मिश्रण एकत्र करा व कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. झाकण काढून त्यात १/४ टीस्पून वेलची पूड व थोडेसे तूप घालून मिश्रण सारखे करा व शि-यासारखे झाल्यावर गॅस बंद करा. एका थाळीला तूप लावून घ्या. तयार मिश्रण तूप लावलेल्या थाळीत एकसारखे थापा.

४) तांदूळाच्या रव्याच्या खांडवीकरिता एका कढईत २ टीस्पून तुप घालून १ वाटी तांदुळाचा रवा भाजुन घ्यावा. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे तुप घालून रवा भाजुन घ्या. त्यात १/२ वाटी खोवलेला नारळ घालून मिश्रण परतून घ्या. रवा छान भाजल्यावर त्यात २ वाट्या उकळीचे पाणी घालून रवा फुलवून घ्या. आवश्यकता वाटल्यास पुन्हा थोडे पाणी घाला. १ वाटी चिरलेला गूळ कढईत घालून मिश्रण एकत्र करा व कढईवर एक झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. झाकण काढून त्यात १/४ टीस्पून वेलची पूड व थोडेसे तूप घालून मिश्रण सारखे करा व मिश्रण शि-यासारखे झाल्यावर गॅस बंद करा. तयार तांदुळाचा शिरा नाचणीच्या शि-यावर थापा. वरून थोडा खोवलेला नारळ घाला. मिश्रण कोमट झाल्यावर त्याच्या वड्या पाडा. 


Recipe in English:

Ingredients:


  • 1 bowl Ragi Rava (semolina)
  • 1 bowl Rice Rava (method of preparing this is given below at sr. no. 1)
  • 2 bowl grated jaggery
  • 1.5 bowl grated/ Scraped coconut 
  • 1/2 tsp cardamom powder 
  • Pure ghee as per requirement

Method:

1) In a pan, roast colum rice on medium flame till it changes it's colour. Drizzle 2-3 drops of pure ghee on rice & roast it for 1-2 minutes. Keep it aside. When it cools down, grind coarsely in the mixer. Our Rice rava is ready for preparing Khandavi.

2) Ragi Rava/ semolina is readily available in the market in grocery shop.

3) Now heat 2 tsp pure ghee & Ragi Rava in the pan on medium flame. Roast it till it fragrant. Add 1/2 bowl scraped/ grated coconut & roast it again for 1-2 minutes. Add 2 bowl boiling water & mix it well, cover it with a lid & cook it for 2-3 minutes. Add jaggery, 1tsp ghee & cardamom powder to it. Mix it well. Cover it with a lid till jaggery melts. When you see the mixture has got spreading consistency, pour the mixture into a greased tray/ thali & flatten it with hand. Allow it to cool down. Cut them into Diamond/ square shape.

4) Repeat the same procedure of Ragi Khandavi to make Rice khandavi. Pour the mixture into the greased tray/ thali.

5) For double decor khandavi, place the rice khandavi on Ragi Khandavi. Garnish it with scraped/ grated coconut, Almond slices& Cashew nuts. Serve the hot Khandavi with pure ghee. .






Comments

Popular Posts