उंडे-याची खीर

आमच्याकडे दरवर्षी गणपती उत्सवात दुस-या दिवशी 'उंडे-याची खीर' केली जाते. माझ्या आजेसासूबाईंकडून सासूबाई व त्यांच्याकडून आम्ही सगळ्या जावा, हि पारंपरिक रेसिपी करायला शिकलो. मूषकराज हे श्री गणेशाचे वाहन. त्याच्याकरिता एक दिवस आमच्याकडे 'उंडे-याची खीर' करायची पध्दत वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. आज या पारंपारिक पदार्थाची रेसिपी देत आहे.

साहित्य:
  • १ वाटी कणिक (गव्हाचे पीठ )
  • १ चमचा रवा
  • १/४ चमचा वेलची पूड 
  • १/२ लिटर दुध 
  • १/२ वाटी साखर (कमी-जास्त आवडीनुसार)
  • साजूक तूप आवश्यकतेनुसार 
  • दुधाचा मसाला ऐच्छिक 
कृती:

१) एका भांड्यात कणिक व रवा घ्या. त्यात १ टीस्पून तुपाचे मोहन घालून घट्टसर कणिक भिजवा. तयार कणकेचे बोराएवढे लहान लहान गोळे करून घ्या. तयार गोळे गरम तुपात गुलाबीसर रंगावर परतून घ्या.


२) एका कढईत दुध तापत ठेवा. त्यात साखर व थोडीशी वेलची पूड घालून दुध आटवून घ्या. आवडत असल्यास त्यात १ चमचा दुधाचा मसाला घाला. तळलेले गोळे दुधात घालून एक उकळी आली की गॅस बंद करा व सर्व्ह करा. 



Comments

Popular Posts