काकडीचे घावन

'काकडीचे घावन' हा एक कोकणातील पारंपारिक प्रकार. काकडीचे घावन करतांना मोठी काकडी वापरली जाते. पण मी सध्या बाजारात मिळणारी हिरवी काकडी वापरली आहे. काकडीच्या घावनाची रेसिपी देत आहे.

साहित्य:

  • १ मध्यम आकाराची काकडी 
  • ३/४ वाटी गुळ 
  • २ वाट्या गव्हाचे पीठ 
  • १/४ वाटी रवा
  • १/२ वाटी तांदूळाचे पीठ 
  • १/२ वाटी खोवलेला नारळ 
  • चिमुटभर मीठ 
  • तेल आवश्यकतेनुसार 
कृती:

१) प्रथम काकडीचे साल काढून काकडी किसून घ्या. गुळामध्ये थोडे पाणी घालून गुळ विरघळवून घ्या.

२) एका भांड्यात किसलेली काकडी, गुळाचे पाणी, गव्हाचे पीठ, रवा, तांदूळाचे पीठ, खोवलेला नारळ, चिमुटभर मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार थोडसं पाणी घालून घावनासारखे पातळसर पीठ भिजवून घ्या. आपल्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता.

३) काईल/ तवा मध्यम आंचेवर तापत ठेवा. तव्यावर १/२ टीस्पून तेल सोडून त्यावर एक लहान पळी पीठ घालून छोटे घावन करा. १-२ मिनिटे झाकण ठेवून नंतर घावन उलटून दुस-या बाजूने शेका. पुन्हा थोडे तेल सोडा. दोन्ही बाजूंनी घावन भाजून घ्या.

३) गरम-गरम काकडीचे घावन साजूक तूपाबरोबर सर्व्ह करा



Comments

Popular Posts