साखर भात
माझ्या चुलत सासूबाईंनी शिकवलेली रेसिपी- साखर भात. महाराष्ट्राची पारंपारिक रेसिपी.
साहित्य:
१) एका भांड्यात तांदुळ धुवून १/२ तास निथळत ठेवा.
२) एका भांड्यात ३-४ वाट्या पाणी उकळत ठेवा. एका कढईत १ टेबलस्पून साजूक तूप घालून त्यात ३-४ लवंगा, काजूचे तुकडे व तांदुळ घाला व गुलाबी रंगावर परतुन घ्या. नंतर त्यात आवश्यकतेनुसार उकळीचे पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या. तयार भात एका परातीत मोकळा करून गार करायला ठेवा.
३) एका पातेल्यात दिड वाटी साखर व सव्वा वाटी पाणी घालून एकतारी पाक करून घ्या. तयार पाकात पिवळा किंवा केशरी रंग घाला. १/४ टीस्पून लिंबाचा रस व वेलची पूड घाला. तयार भात, १ टेबलस्पून साजूक तूप व साखरेचा पाक एका कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात एकत्र करून मंद आचेवर ठेवून हलक्या हाताने ढवळा. भात कोरडा झाल्यावर गॅस बंद करून भात एका भांड्यात काढून घ्या.
३) तयार भातावर काजूचे तुकडे व बेदाणे घालून सर्व्ह करा.
साहित्य:
- २ वाट्या तांदुळ
- दिड वाटी साखर
- ३-४ लवंगा
- १/४ टीस्पून वेलची पूड
- १/४ टीस्पून लिंबाचा रस
- साजूक तूप आवश्यकतेनुसार
- काजूचे तुकडे व बेदाणे आवडीनुसार
- पाणी भात शिजवण्यासाठी
- खायचा रंग पिवळा/केशरी
१) एका भांड्यात तांदुळ धुवून १/२ तास निथळत ठेवा.
२) एका भांड्यात ३-४ वाट्या पाणी उकळत ठेवा. एका कढईत १ टेबलस्पून साजूक तूप घालून त्यात ३-४ लवंगा, काजूचे तुकडे व तांदुळ घाला व गुलाबी रंगावर परतुन घ्या. नंतर त्यात आवश्यकतेनुसार उकळीचे पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या. तयार भात एका परातीत मोकळा करून गार करायला ठेवा.
३) एका पातेल्यात दिड वाटी साखर व सव्वा वाटी पाणी घालून एकतारी पाक करून घ्या. तयार पाकात पिवळा किंवा केशरी रंग घाला. १/४ टीस्पून लिंबाचा रस व वेलची पूड घाला. तयार भात, १ टेबलस्पून साजूक तूप व साखरेचा पाक एका कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात एकत्र करून मंद आचेवर ठेवून हलक्या हाताने ढवळा. भात कोरडा झाल्यावर गॅस बंद करून भात एका भांड्यात काढून घ्या.
३) तयार भातावर काजूचे तुकडे व बेदाणे घालून सर्व्ह करा.
Comments
Post a Comment