फणसाच्या पु-या (गोड) / Jack fruit Puri (Sweet)
फणस बाहेरून काटेरी पण आतून मऊ असतो. कोकण प्रांतात आंबा, काजू, नारळ, सुपारी इतकाच फणससुद्धा प्रसिद्ध आहे. फणसाचे विविध पदार्थ कोकण व गोवा प्रांतात केले जातात. 'कापा फणस' व 'बरका फणस' अश्या फणसाच्या दोन जाती आहेत. 'कापा फणस' थोडासा कडक असतो व 'बरका फणस' मऊ, गोड व गडद सोनेरी रंगाचा असतो. बरक्या फणसाचा रस पटकन निघतो. कच्चा फणसाचा वापर भाजी, वेफर्स, इत्यादी तयार करण्यासाठी केला जातो तर पिकलेला फणस सांदण, पुऱ्या, फणस पोळी करतांना बहुतेक करून वापरतात. फणसाच्या आठळ्या (बिया) भाजून किंवा उकडून खाता येतात. एका पातेलीवर चाळणी ठेवून, त्यात पिकलेल्या फणसाचे गरे ठेवून त्याचा रस गाळून काढता येतो. फणसामध्ये व्हिटॅमिन 'ए', फायबर, पोटॅशिअम व इतर पोषक तत्व असतात. मुलांना भूक लागली की, संध्याकाळी खायला किंवा शाळेच्या डब्यात देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
पाहूया "फणसाच्या पुऱ्या" करायची पाककृती.
रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
*सर्व्हिंग: २०-२५ पुऱ्या
*तयार करण्याचा वेळ : २५-३० मिनिटे
साहित्य :
- २ वाट्या गव्हाचे पीठ
- १/२ वाटी तांदुळाचे पीठ
- १ वाटी फणसाचा रस
- १/२ वाटी गूळ पावडर/ चिरलेला गूळ
- १ टेबलस्पून गरम तेल
- तळण्यासाठी तेल
कृती:
१) गव्हाचे पीठ, तांदुळाचे पीठ व गूळ पावडर एकत्र करून त्यावर गरम तेलाचे मोहन घालून मिश्रण एकत्र करावे. त्यात फणसाचा रस घालून घट्टसर कणिक भिजवून घ्यावी. गरज वाटली तर थोडा फणसाचा रस किंवा थोडा पाण्याचा हात लावून कणिक भिजवावी. तयार कणिक १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
२) नंतर कणिक पुन्हा १-२ मिनिटे मळावी व त्याचे पुरीकरिता करतो तसे लहान-लहान गोळे करावेत
तयार गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घ्या.
३) एका कढईत तेल तापवून मध्यम आंचेवर पुऱ्या दोन्ही बाजुनी सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
# Jack fruit Puri #
Jack fruit is a big fruit which contains Vitamin A, Calcium, Potassium and Fiber. There are two types of Jack fruits. One is called "Kappa Fanas" which is sweet but little bit hard and the other type of Jack fruit is called "Barka Fanas" which is soft, sweet, dark gold colour and has a fruity aroma. It is easy to extract pulp from Barka Fanas, using strainer. Various types of dishes are made with raw Jack fruit as well as ripe Jack fruit. Raw Jack fruit is used for preparing wafers, chivada and subjis. Ripe Jack fruit is used for preparing typical traditional dishes like Sandan, Fanas poli, Puris, Jams etc. You can serve sweet Jack fruit Puri for breakfast, evening snacks and also for kid's tiffin box. Let's see the recipe of 'Jack fruit Puri'
If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.
* Serving : For making 20-25 Puries
* Cooking time: 25-30 minutes
Ingredients:
- 2 bowl Wheat Flour
- 1/2 bowl Rice Flour
- 1 bowl Ripe Jack fruit Pulp
- 1/2 bowl Jaggery (chopped) /Jaggery powder
- 1 tbsp Oil
- Oil for frying
1) In a large mixing bowl, combine Wheat flour, Rice flour and Jaggery powder. Heat 1 tbsp Oil in a small pan and add it to the mixture and mix it well. Now add Jack fruit Pulp in it and knead a semi-soft dough. Cover it with a lid and keep it aside for 15-20 minutes.
2) After 15 minutes, knead the dough again for 1-2 minutes. Divide the dough in small equal portion to roll Puris. Flatten all dough balls. Place flattened ball on rolling board and roll them with rolling pin. Roll all Puris in a circular shape.
3) Now, on a medium flame, heat Oil in a pan. Deep fry all Puris in Oil, till it turns golden brown from both the sides (place only one Puri at a time.)
4) Serve delicious sweet Jack fruit Puris.
Unik...👌👌😊
ReplyDelete