लापशी रव्याची खीर/ Daliya Kheer


'लापशी रव्याची खीर' हा एक पौष्टिक पदार्थ आहे. 'लापशी रवा' म्हणजे 'दलिया'. यापासून खिचडी, उपमा, पॅटीस सारखे वेगवेगळॆ प्रकार केले जातात. कुटुंबातील 
अगदी सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आहारात दलियाचा समावेश उपयुक्त ठरू शकतो. लापशी रव्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असून फायबर, व्हिटॅमिन्स व मिनरल्स ही असतात असे माझ्या वाचनात आले आहे. रोज नाश्त्यासाठी किंवा जेवणात आपण याचा वापर करू शकतो. लापशी रव्याची खीर करायला सोपी असून, लागणारे साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध होऊ शकते किंवा दुकानात सहज मिळते. अशी ही बहुगुणी 'लापशी रव्याची खीर' कशी करायची ते पाहू या.

रेसिपी आवडली तर लाईक,शेअर, सबस्क्राईब व कमेंट नक्की करा.

*सर्व्हिंग:  ४-५ माणसांसाठी 
*तयार करण्याचा वेळ : ३०-३५ मिनिटे 

साहित्य:
  • १ कप लापशी रवा
  • १ कप गूळ (गुळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता).
  • १ कप खोवलेला नारळ 
  • २ टेबलस्पून तूप 
  • दूध जरूरीप्रमाणे 
  • बदाम व पिस्त्याचे काप
कृती:

१) एका पातेलीत ४-५ वाट्या पाणी उकळत ठेवावे.

२) एका कढईत थोड्या तुपावर लापशी रवा लालसर रंगावर खमंग भाजून घ्या. 


३) रवा भाजून झाल्यावर, त्यात उकळीचे पाणी घालावे व कढईतले मिश्रण एका भांड्यात काढून कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवावे. कुकरच्या ३ शिट्या कराव्यात. कुकर गार झाल्यावर शिजलेला रवा कढईत काढावा.

४) शिजलेल्या रव्यामध्ये खोवलेला नारळ घालून २-३ मिनिटे रवा परता.


५) मिश्रणात बारीक चिरलेला गूळ घालून त्यावर झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफवावे .



६) गूळ पूर्ण विरघळल्यावर त्यात आवडीनुसार बदाम व पिस्त्याचे काप घालावे. 



७) तयार मिश्रणात १ कप दूध घालून मिश्रण २-३ मिनिटे शिजवावे.



८) मिश्रणातील दूध पूर्णपणे आटले की, गॅस बंद करावा.



९) खीर सर्व्ह करतांना बाऊलमध्ये दूध घालून सर्व्ह करावी. मिश्रणामध्ये आयत्या वेळी दूध घालावे कारण दलिया मध्ये दूध शोषले जाते व खीर घट्ट होते. माझ्याकडे मिश्रणामध्ये दूध न घालता तयार मिश्रण नुसते शिऱ्यासारखे सुद्धा खायला आवडते.



#Daliya kheer #

Broken Wheat, Bulgar Wheat or Lapsi Rava is also popularly known as Daliya. Daliya kheer is my favourite sweet or dessert. Daliya is good food for growing kids and even good for all family members of any age group. One can make several dishes like Kheer, Khichadi, Upma, Tasty Patties etc. with it.  Daliya is one of the healthiest option for our daily meals. I have read that Daliya is loaded with Protein, Fiber, Vitamins and Minerals too. Daliya Kheer is very easy to prepare . I use Jaggery, fresh coconut, milk and ghee in it. These all ingredients are easily available at home or near by stores. Let's see the recipe of Daliya Kheer.

If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.

*Serving for 4-5 persons
*Cooking time: 30-35 minutes 

Ingredients:
  • 1 cup Daliya 
  • 1 cup Jaggery (You can add or reduce the proportion of Jaggery).
  • 1 cup Fresh grated Coconut
  • 2 tbsp Ghee
  • Milk as required
  • Badam & Pistachio slices 
Method:

1) Keep 3-4 cups Water in a vessel to boil.

2) Roast Daliya in Ghee till it turns golden brown.


3) When Daliya gets roasted, add boiling water in a pan and  mix it well. Now take this mixture in a vessel and cook it in a cooker upto three whistles. When cooker gets cool and pressure is released, pour this mixture into the pan.

4) Add grated Coconut in it,  mix it well and cook it for 2-3 minutes.


5) Add chopped Jaggery in it and mix it well. Cover it with a lid and cook it till Jaggery gets dissolved well.


6) Add Badam & Pistachio slices in the mixture.


7) Add 1 cup Milk in it and mix it well. Cook it again for 2-3 minutes. 


8)  When Milk gets completely absorbed in the mixture, then put off the flame.


9) While serving, add milk in it as required. Do not add milk in whole mixture at a time as it gets absorbed in Daliya. My family members also like to have it without adding milk in it.


Comments

Popular Posts