कणकेचे गोड दिवे/ Wheat Flour Diyas (Sweet)



आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच 'आषाढ अमावास्या'. या अमावास्येलाच आपण सगळे 'दिव्याची अमावास्या' म्हणून ओळखतो. आषाढ महिना संपून श्रावण महिना सुरु होतो म्हणून या दिवशी बरेच मांसाहारी लोक मांसाहार करतात व आषाढ अमावास्या 'गटारी अमावास्या' म्हणून साजरी करतात. खरंतर आपल्या परंपरेनुसार या दिवशी घरातील सगळे दिवे, निरांजने, समया घासून, दूध पाण्याने धुवून, त्याची पूजा करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. या दिवशी दीपपूजन करायची जागा स्वछ करावी, सभोवताली रांगोळी काढून, सगळ्या दिव्यांमध्ये तेल किंवा तूप घालून दिवे लावावेत, हळदी कुंकू व पिवळी फुले वाहावीत, शक्य असेल तर दिव्याची कहाणी वाचावी, गोड कणकेच्या दिव्याचा नैवैद्य दाखवावा व दिव्याची प्रार्थना करावी. 

"हे दिव्या, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर" अशी प्रार्थना केली जाते.

दरवर्षी आम्ही घरातील सगळे एकत्र येऊन 'दिव्याची अमावस्या' वरील प्रमाणे 'दीपपूजन' करून साजरी करतो. कणकेचे गोड दिवे करून ते वाफवतो व त्याचा नैवेद्य अर्पण करतो. कणिक, गुळ व तुप  खाण्यासाठी  पौष्टिक  असते. गुळामध्ये लोह असते तर साजूक तुपाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फक्त त्याचे सेवन योग्य प्रमाणात असावे. कणकेचे गोड दिवे व त्याबरोबर तूप खायला मस्तच लागते. माझ्याकडे तर त्या दिवशी जेवणात भरपूर दिवे व तूप आवडीने खातात. पाहूया 'कणकेचे गोड दिवे' करायची पाककृती. 

रेसिपी आवडली तर लाईक,शेअर, सबस्क्राईब व कमेंट नक्की करा.

*सर्व्हिंग: २०-२२ दिवे   
*तयार करण्याचा वेळ : ३०-३५ मिनिटे 

साहित्य:
  • १ कप गुळ
  • १/ कप पाणी
  • २ कप गव्हाचे पीठ 
  •  टेबलस्पून रवा
  • १/४ टीस्पून  हळद
  • २ टेबलस्पून तेल
कृती:
१) 
(अ) गुळ बारीक चिरून घ्या. एका भांड्यात पाणी व गुळ एकत्र करून २-३ मिनिटे गॅसवर गरम करा. गुळ विरघळला की, गॅस बंद करा. गुळाचे पाणी गार करून, गाळण्याने गाळून घ्या. 
(किंवा)
(ब) एका भांड्यात चिरलेला गुळ व पाणी एकत्र करून थोडा वेळ ठेवा. नंतर चमच्याने ढवळून गुळ विरघळवा व गुळाचे पाणी गाळण्याने गाळून घ्या.

 

२) एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा व हळद घ्या. १ टेबलस्पून तेल गरम करून मिश्रणात घाला व मिश्रण एकत्र करून घ्या. तयार मिश्रणात गुळाचे पाणी घालून कणिक भिजवून घ्या. आवश्यकता वाटल्यास १-२ टेबलस्पून गव्हाचे पीठ घाला (पुरीकरिता जशी कणिक भिजवतो तशी भिजवा). थोडेसे तेल लावून कणिक मळून घ्या व १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
  


३) आपल्या आवडीनुसार कणकेचे छोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळ्याची खोलगट वाटी करून त्याला दिव्याचा आकार द्या व सगळॆ दिवे तयार करून घ्या.
 

 ४) कुकरमध्ये किंवा मोदक-पात्रामध्ये पाणी घालून, पाणी उकळवत ठेवा. एका चाळणीला थोडे तेल लावा किंवा केळीचे पान असेल तर चाळणीत ठेवा. पाणी उकळले की,चाळणीत दिवे ठेवून, कुकरमध्ये /मोदकपात्रामध्ये दिवे १२-१५ मिनिटे वाफवा. (दिवे वाफवतांना दिव्यांमध्ये थोडे थोडे अंतर ठेवा. दिवे वाफवल्यानंतर थोडे फुलतात).

 
 ५) गरम-गरम वाफवलेल्या दिव्यांवर साजूक तुप घालून सर्व्ह करावे.



# Wheat Flour Diyas (Sweet) #


As per the Marathi Calendar, 'Aashadh' month is the fourth month of the year. Last day of this month is 'No Moon Day' or 'Aashadhi Amavasya'. In Maharashtra we celebrate it as 'Divyachi Aavas' or 'Deep Amavasya'. This day has spiritual significance. On this day, we do Deep Pooja at our home in the evening. For the Deep Poojan, Pooja place is cleaned and then colourful Rangoli is designed around it. All Diyas (Lamps lit before God) in the home are cleaned and washed with milk and water. All diyas are filled with ghee or oil and lit and they are placed for pooja . We pray before it. On this day we prepare 'Wheat Flour Diyas'. For preparing diya, we mix Jaggery syrup in Wheat Flour. We offer these diyas to God as Navidyam. We have it as a Prasad. It is our tradition to make Wheat Flour Diyas on this auspicious day. For preparing  Sweet Diyas, all ingredients are easily available at our home. Diyas are served with pure ghee. Let's see the recipe.

If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.

*Serving for 4-5 persons
*Cooking time: 30-35 minutes 

Ingredients:
  • 2 cups Wheat flour 
  • 1 cup  Jaggery (grated or chopped)
  • 1/2 cup Water
  • 1 tbsp Semolina (Rava)
  • 1/4 tsp Turmeric Powder
  • 2 tbsp Oil
Method:

1) 
(a) In a vessel, take Jaggery and add Water. Keep the mixture aside and after some time, stir it with a spoon and dissolve Jaggery completely in it. Strain it with the help of a strainer and keep it aside. 
(Or) 
(b) Heat Water and Jaggery in a vessel for 2-3 minutes and stir it with spoon until Jaggery gets completely dissolved. Do not over-boil it to get it thicken. Then strain it with strainer. Allow it to  cool down completely.


2) In a mixing bowl, add Wheat Flour, Turmeric powder and Semolina (Rava) in it. Heat 1 tbsp Oil, add it in the flour mix and mix it well. Now add Jaggery syrup and knead a semi soft dough. Add 1-2 tbsp Wheat flour, if needed. Apply some Oil and knead a dough again for 2-3 minutes, cover it with a lid and rest the dough for 10-15 minutes. 


3) Make small balls and shape it in Diya shape as shown below. Shape all the remaining balls in Diya shape.


4) Heat water in a Steamer or Cooker. Grease the plate with Oil or place a Banana leaf in the plate. Place all Wheat Flour Diyas on a greased plate. Keep some distance between the Diyas while boiling as after boiling, the Diyas get puffed. Steam it in the Steamer or Cooker for 12-15 minutes on medium flame.


5) Serve delicious Wheat Flour Diyas with Pure Ghee.


Comments

Popular Posts