मेथी पराठा /Fenugreek Leaves Paratha



सकाळी गोडाचे जेवण झाल्यामुळे, घरातील सगळ्यांना रात्री साधारणच भूक होती. संध्याकाळी पटकन व सोपा असा गरमा-गरम पदार्थ काय करता येईल? यासाठी माझे विचारमंथन सुरू झाले. इतक्यात माझे लक्ष मेथीच्या भाजीकडे गेले. लगेचच मनात 'मेथीचे पराठे' करायचे ठरवून मी, माझे काम सुरू केले. मेथी धूवून, बारीक चिरून घेतली. कणिकेत सगळे साहित्य घालून पराठ्याची कणिक भिजवून झाली, तोपर्यंत मुलींनी ताटं, वाट्या व मेथी पराठ्यांशी खाण्याकरिता घरचं कणीदार साजूक तूप, कैरीचं लोणचं व दही टेबलवर नेऊन ठेवले. मी तवा तापत ठेवून, लगेचच पराठे करायला घेतले.                          
सगळ्यांची डायनिंग टेबलवर बैठक जमली. गप्पा मारत मारत गरमा-गरम मेथीचे सगळे पराठे फस्तसुध्दा झाले. प्रत्येकाकडे असे हे स्वादिष्ट व बहूतेकांच्या आवडीचे मेथी पराठे एकदा तरी होतातच. काही वेळा संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. पोळी- भाजी,आमटी-भात न करता एखादाच पोटभरीचा पदार्थ केला तरी पुरेसे होते. अशा या एकपात्री पदार्था मधून चांगली पोषणमूल्ये सुध्दा मिळतात. पाहूया 'मेथी पराठा' करायची पाककृती.

रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.

*सर्व्हिंग: ३-४ माणसांसाठी
*तयार करण्याचा वेळ : २५-३० मिनिटे 

साहित्य:
  • १ कप बारीक चिरलेली मेथी
  •  २ कप गव्हाचे पीठ
  •  १/४ कप चणाडाळीचे पीठ
  •  १ टेबलस्पून तीळ
  •  १ टीस्पून लाल तिखट
  •  १/२ टीस्पून हळद
  •  १/४ हिंग
  •  १ टीस्पून ओवा
  •  २ टीस्पून हिरव्या मिरच्या व लसुण पेस्ट
  •  मीठ चवीनुसार
कृती:
१) सगळे साहित्य एकत्र करून कणिक मऊसर भिजवून घ्या.




२) तयार पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून पातळ पराठे लाटा.



३) पराठे दोन्ही बाजूंनी मध्यम आंचेवर तव्यावर भाजून घ्या. पराठे भाजतांना दोन्ही बाजूंवर थोडं तेल सोडून भाजा.  





४) गरमागरम मेथी पराठे, दही व हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. 

हिरवी चटणी (पुदिना-पालक-कोथिंबीर चटणी):

साहित्य:
  •  २-३ टेबलस्पून शेंगदाणे
  •  २-३ पालकाची पानं
  •  १/४ कप पुदिना
  •  १/२ कप कोथिंबीर
  •  १-२ हिरव्या मिरच्या
  •  ३-४ लसुण पाकळ्या
  •  १/२" आलं
  •  २ टेबलस्पून गोड दही
  •  मीठ चवीनुसार
कृती:
 १) वरील सगळे साहित्य एकत्र करून बारीक चटणी वाटा.



# Fenugreek Leaves Paratha #



'Methi Paratha' is famous Indian Flatbread which is generally made for breakfast. You can also serve it as an evening snacks with tea. Methi Paratha is made with Fresh Fenugreek leaves (Methi). It is a healthy and nutritious food. We get vitamins, fibre and iron from it. Methi Paratha is an easy and quick recipe for children's school tiffin. We also get proteins from it as it contains Wheat flour and Besan in it. You can serve 'Methi Paratha' with fresh Curd, Raw Mango Pickle, Ghee, Tomato Ketchup or with Chutney. Let's see the simple and easy recipe of this healthy 'Methi Paratha'.

If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog. 

*Serving: For 3-4 persons
*Preparation time: 25-30 minutes

Ingredients:
  • 1 cup chopped Fenugreek Leaves
  • 2 cups Wheat Flour
  • 1/4 cup Chick Pea Flour (Besan) 
  • 1 tbsp Sesame seeds
  • 1 tsp Red Chili Powder 
  • 1/2 tsp Turmeric Powder
  • 1/4 tsp Asafoetida 
  • 1 tsp Ajwain (Carom seeds)
  • 2 tsp Green Chili & Garlic Paste
  • Salt as per taste
Method:

1) Mix all the above ingredients and knead a soft and smooth dough like Chapati aata.




2) Divide the dough into 12-13 equal portions and make their balls. Dust a dough ball in wheat flour. Now on the rolling board (chakala), place the dough ball and roll it with a rolling pin (belan) in circular shape and make a thin paratha. Follow the same steps for the remaining dough balls.



3) Heat a skillet (tava) on medium flame and place Paratha on it. Smear some Oil while roasting. Cook both the sides of the Paratha and roast them till they get light brown in colour as shown in the picture below. 



4) Serve delicious 'Fenugreek Paratha' with Curd and Green Chutney.

Green Chutney (Mint-Coriander-Spinach Chutney):

Ingredients:
  • 2-3 tbsp Groundnuts
  • 2-3 Spinach Leaves 
  • 1/4 cup Mint Leaves 
  • 1/2 cup Coriander Leaves 
  • 1-2 Green Chilies
  • 3-4 Garlic Cloves 
  • 1/2 " Ginger
  • 2 tbsp Curd 
  • Salt as per taste 
Method:

1) Mix all the ingredients together and grind it in a mixer and make Chutney. 


Comments

Post a Comment

Popular Posts