फणसाची कुल्फी/Jack Fruit Kulfi
'कुल्फी' म्हटलं की लहानपण आठवतं. "कुल्फीsss योsss" असे ओरडत कुल्फीवाला येत असे . पांढराशुभ्र लेंगा- शर्ट व डोक्यावर टोपी असा कुल्फीवाल्याचा पेहराव आणि त्याच्या डोक्यावर एका लाल रंगाच्या कापडाने झाकलेली भली मोठी टोपली व त्यात ठेवलेल्या थंडगार अश्या अनेक कुल्फ्या. त्याच्याकडे मिळणाऱ्या कुल्फीचे आम्हाला विशेष आकर्षण असे. 'थंडगार कुल्फी ' अगदी २५ पैसे, ५० पैसे किंवा १ रुपयात मिळत असे. कुल्फीवाला माठामधून कुल्फीचा एक मोल्ड काढून, पाण्यात बुडवून झाला की, दोन हातात गोलाकार फिरवून, कुल्फी अलगदपणे सोडवून हातात देत असे. कुल्फी खातांना एका हाताने कुल्फी धरायची तर दुसरा हात कुल्फीचे थेम्ब सांडले, तर हातावर घेण्यासाठी धरायचा आणि कितीही सांभाळून खाल्ली तरी अर्धी कुल्फी बऱ्याचदा तुटायची आणि मग घाईघाईने ती संपवायची. अलीकडे मोठ्या-मोठ्या ब्रॅण्डची 'कुल्फी व आईस्क्रीम' अगदी सगळीकडे सहज मिळते. कुल्फी मध्ये 'स्लाईस कुल्फी', 'मटका कुल्फी' असे अनेक प्रकार व सीताफळ, मँगो, केसर-पिस्ता सारखे वेगवेगळे फ्लेवर्स सुद्धा मिळतात. कोणती घ्यावी हेच कळत नाही. त्यातल्या त्यात मला मलाई कुल्फी व मँगो कुल्फी विशेष प्रिय आहे.
आमचे बऱ्याचदा कोकणात जाणे होते आणि 'दाभोळ' बंदरातून 'धोपावे' ला जाण्यासाठी बोटींमधून पलीकडे जावे लागते. या बोटींमध्ये फणस आईस्क्रीमची चव मी पहिल्यांदाच चाखली. आईस्क्रीम खाता-खाता पाच मिनिटांमध्ये बोट कधी पलीकडे जायची हे कळायचे सुद्धा नाही. सगळ्यांना फणस आईस्क्रीम खूपच आवडायचे. या वेळी मला बरका फणस मिळाला म्हणून त्याचे नवनवीन प्रकार करायचे ठरवले. त्यात 'फणसाची कुल्फी' करून पहिली व खूप मस्त झाली आणि घरातील सगळ्यांनाच खूप आवडली. अशी हि 'फणसाची कुल्फी' कशी करायची ते पाहूया.
रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.
*सर्व्हिंग: ७-८ तयार कुल्फी
*तयार करण्याचा वेळ : २५-३० मिनिटे
*सर्व्हिंग: ७-८ तयार कुल्फी
*तयार करण्याचा वेळ : २५-३० मिनिटे
- १ लिटर म्हशीचे दूध
- १ कप फणसाचा रस*
- १/3 कप साखर
- १ टेबलस्पून कस्टर्ड पावडर
- १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
- २ टेबलस्पून दूध
- ४ टेबलस्पून मिल्क पावडर
- थोडासा पिवळा रंग (ऐच्छिक)
- थोडेसे केशर (ऐच्छिक)
- पिस्ता व बदामाचे काप (आवडीनुसार)
१) एका कढईत किंवा पातेल्यात १ लिटर दूध उकळवत ठेवा. एक लिटर दुधाचे जवळपास पाऊण लिटर दूध होईपर्यंत आटवावे. नंतर त्यात साखर घालून पुन्हा ५ मिनिटे उकळवावे. (साखरेचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे.)
२) कस्टर्ड पावडर व कॉर्नफ्लोअर एकत्र करून त्यात२ टेबलस्पून दूध घालून त्याची पेस्ट करावी. तयार पेस्ट उकळत्या दुधात एकत्र करावी. पेस्ट घातली की, सतत डावाने ढवळावे व गुठळी होणार नाही याची काळजी घ्यावी. तयार मिश्रण ४-५ मिनिटे मध्यम आंचेवर उकळवावे. मिश्रण दाटसर झाल्यावर गॅस बंद करा व मिश्रण गार होऊ द्या.
३) दूध गार झाल्यावर, त्यात फणसाचा गर, दूध पावडर व पिवळा रंग (ऐच्छिक) घालावा. आवडत असल्यास थोडेसे केशर घालावे व इलेक्ट्रिक ब्लेंडर किंवा मिक्सरच्या भांड्यात २-३ मिनिटे फिरवून मिश्रण एकत्र करावे.
४)तयार मिश्रणात आपल्या आवडीनुसार पिस्ता व बदामाचे काप घालून मिश्रण ढवळावे व तयार मिश्रण कुल्फी मोल्ड मध्ये घालून ८-९ तास फ्रिझरमध्ये ठेवा.
५) पिस्ताचे काप घालून थंडगार कुल्फी सर्व्ह करा.
*फणसाचा रस काढतांना, फणसातील आठळ्या सावकाश काढून घ्या. एका भांड्यावर बारीक जाळीची चाळणी ठेवा. त्यात फणसाचे गरे घालून हाताने घोटावे. फणसाचा रस खालील पातेल्यात पडेल व चोथा चाळणीत राहिल.
# Jack fruit Kulfi #
'Kulfi', the word itself is mouthwatering. Kulfi is a frozen dairy dessert. It is a traditional Ice-cream, popular in India. Kulfi is available in various flavors like Mango, Malai, Kesar-Pista, Elaichi, Saffron, etc. Now a days we get 'Slice Kulfi' and 'Matka Kulfi' in many Ice-Cream Parlors. Slice Kulfi is cut and served in a dish while 'Matka Kulfi' is directly served with spoon in earthen pot.
Jack fruit is a big fruit which contains Vitamin A, Calcium, Potassium and Fiber. Raw Jack Fruit is used to prepare Curry, Wafers, Chivada etc. and Ripe Jack Fruit is used to prepare various traditional sweet dishes like Puris, Sandan, Kheer, etc. Many people are perparing Idli using Jack Fruit. There are two types of Jack Fruits. One is 'Dry Jack Fruit' called 'Kaapa' it is little bit hard and sweet and other is 'Juicy' called 'Barka' which is soft, sweet, dark golden in colour and has fruity aroma.
Today I have tried 'Jack Fruit Kulfi'. For preparing it, I have used Juicy ('Barka') Jack Fruit. We all like it very much. Let's see the recipe of 'Jack Fruit Kulfi'.
If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.
*Serving: 7-8 Kulfis
*Preparation time: 25-30 minutes.
Ingredients:
- 1 liter full fat Milk
- 1 Cup Jack fruit Pulp*
- 1/3 cup Sugar
- 1 tbsp Custard Powder
- 1 tbsp Cornflour
- 4 tbsp Milk Powder
- 2 tbsp Milk
- 1/8 tsp Lemon-Yellow colour (optional)
- a pinch of Saffron (optional)
- Pistachio & Almond Slices as required
1) Boil Milk in a wok or vessel. When Milk thickens and reduces, add Sugar and boil it again for 4-5 minutes. (You can add or reduce sugar as per your taste).
2) Add 2 tbsp Milk in Custard Powder and Cornflour and mix it well and make paste. Add this paste to the boiling milk very slowly and stir it continuously, so that no lumps are formed. Boil the mixture on medium flame for 4-5 minutes. When mixture gets thick, put the flame off. Let the mixture get cooled down completely.
3) Now add Jack Fruit pulp, Milk powder and Lemon Yellow colour (optional) to the mixture and blend the mixture with blender or in a mixer jar for 2-3 minutes.
4) Add Pistachio & Almond Slices (as required) to the Kulfi mixture. Now fill the above mixture in Kulfi moulds, cover it and keep all moulds in freezer for 8-9 hours.
5) Garnish it with Pistachio and Almond slices and serve the tasty Jack fruit Kulfi.
*For extracting Jack Fruit pulp, use strainer. First de-seed the Jack Fruit Bulbs and then keep the strainer on a vessel. Now place the Jack Fruit bulbs on it and push them to extract the pulp.
Comments
Post a Comment