फ्युजन दिंडं /Fusion Dinda



# फ्युजन दिंडं #
श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी ही 'नागपंचमी' म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते. हा सण विशेष करून स्त्रिया व मुलींचा मानला जातो. पूर्वीच्या काळी नागपंचमीला मुली माहेरपणाला यायच्या. नागपंचमीला  स्त्रिया हातावर मेंदी काढतात. तसेच नवीन कपडे घालून मस्त नटून-थटून वारूळाची पूजा करायला जातात. काही जणी या दिवशी उपास करतात. बहुतेक जणी घरीच नागाची, मातीची मूर्ती आणून पूजा करतात किंवा पाटावर हळद व चंदनाने नाग व नागकुळं काढतात. त्याला हळदी-कुंकू, दूर्वा, आघाडा वाहतात. दूध व ज्वारीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवून नागाची पूजा करतात व नागपंचमीची कहाणी वाचतात. साप शेतातील उंदरांचा नायनाट करून शेतकऱ्याला मदतच करतो म्हणून शेतकरी व साप एकमेकांचे मित्र आहेत. शेतकरी सुध्दा नागपंचमीला जमीन नांगरत नाही. नागपंचमीच्या दिवशी चिरणे, तळणे करू नये असे म्हणतात. पण आता काळ बदलला आहे, त्यामुळे हि प्रथा फारशी कुणी पाळत नाही. या दिवशी तव्यावर पोळी करत नाही, तसेच भाजी सुद्धा चिरत नाहीत. बहुतेक म्हणूनच आपल्याकडे उकडलेले पदार्थ खाण्याची प्रथा आहे. पारंपारिक असे गोडाचे पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक, सांदण, पुरणाची दिंडं केली जातात. माझ्या माहेरी 'पुरणाची दिंडं' करतात तर सासरी 'नारळाची दिंडं' करतात, मला दोन्ही प्रकारची दिंडं आवडतात. या वेळी मी हे दोन्ही प्रकार एकत्र करून नवीन फ्युजन दिंडं केली आहेत आणि छान जमलीसुद्धा म्हणून याची रेसिपी शेअर करते.   

रंगीत दिंडं दिसायला छान दिसतात म्हणून दिंडं करतांना मी दोन रंग वापरले आहेत. तुम्ही रंग न वापरतासुद्धा दिंडं करू शकता.

रेसिपी आवडली तर लाईक,शेअर, सबस्क्राईब व कमेंट नक्की करा.

*सर्व्हिंग:  ७-८ नग (अंदाजे)  
*तयार करण्याचा वेळ :  ४०-४५ मिनिटे 

साहित्य: 

कव्हरसाठी:
  • ३ वाट्या मोदकाची पीठी
  • २ टेबलस्पून गव्हाचे पीठ 
  • १ टीस्पून तेल 
  • चिमूटभर मीठ
  • ३ वाट्या पाणी 
  • खायचा रंग हिरवा व पिवळा (आवडीनुसार)
सारणासाठी:
  • १ वाटी खोवलेला नारळ
  • १ वाटी चणाडाळ
  • दीड वाटी चिरलेला गूळ (आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरू शकता.)
  • १ टीस्पून भाजलेली खसखस
  • २ टेबलस्पून काजूचे तुकडे 
  • १/४ टीस्पून वेलची पावडर 
कृती:

एका भांड्यात चणाडाळ धुवून घ्या. चणाडाळीमध्ये  थोडे पाणी घालून कुकरमध्ये डाळ शिजवून घ्या. शिजवलेली डाळ चाळणीत उपसून त्यातील पाणी काढून घ्या.

) एका जाड बुडाच्या पातेलीत/कढईत चिरलेला गूळ खोवलेला नारळ घालून मिश्रण परतून घ्या. मिश्रण थोडंसं आटलं की, त्यात शिजलेली डाळ घालून पुन्हा थोडा वेळ परता. मिश्रण कोरडं होत आल्यावर त्यात वेलची पावडर , भाजलेली खसखस काजूचे तुकडे घालून मिश्रण एकत्र करा. तयार सारण एका भांड्यात काढून गार करायला ठेवा.  


३) एका पातेलीत पाणी उकळत ठेवा. त्यात चिमूटभर मीठ व १ टीस्पून तेल घाला. पाण्याला उकळी आली की, त्यात मोदकाची पीठी व गव्हाचे पीठ घालून मिश्रण ढवळा. त्यावर १०-१५ मिनिटे झाकण ठेवा. थोडे कोमटसर झाल्यावर, त्याचे दोन भाग करून घ्या. एका भागात हिरवा रंग व एका भागात पिवळा रंग घाला व दोन्ही रंगाची उकड वेगवेगळी मळून घ्या. दोन रंगाचे लहान-लहान गोळे करा. ते एकमेकांना जोडून एक गोळी तयार करा व पुरी लाटून, त्यात १ चमचा तयार सारण भरा व त्याला दिंडाचा आकार द्या. 


४) एका चाळणीत केळीचे पानावर दिंडं ठेवून, कूकरमधे किंवा मोदक पात्रामध्ये १२-१५ मिनिटे वाफवून घ्या. (केळीचे पान नसेल तर चाळणीला थोडेसे तेल लावा व त्यावर दिंडं ठेवून वाफवा).



















५) गरम गरम दिंडं कणीदार तुपाबरोबर सर्व्ह करा. 

Fusion Dinda #


'Nagpanchami' is a festival celebrated all over in Maharashtra, which falls on the fifth day of first fortnight of Marathi month 'Shravan' i.e. on Panchami as per Marathi  calendar. On this day, people worship Cobra (Nagraj). Some of them bring Clay idol of Cobra or draw a picture of it with Turmeric powder and Sandalwood paste on a wooden patla (Pooja chowki) and offer Haldi-Kumkum, milk, flowers, Durva and pray before it. Fried food is not cooked on this day. Boiled traditional sweets like Modak, Sandan, Puranachi Dinda etc. are prepared and offered to Nagraj. Many ladies keep fast on this day. My mother used to prepare Dinda with Puran stuffing and my mother in law, with Coconut stuffing. I love both the varieties of Dinda. So I have tried a combination of both these methods. I got good result from it. I have named it as 'Fusion Dinda' which is delicious in taste and easy to prepare. Let's see the recipe of 'Fusion Dinda'
Here I have used two colours. If you don't have colours, you can skip it. It looks good in two colours. 

If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.

*Serving: 7-8 pieces approx.
*Preparation time: 40-45 minutes 

Ingredients:

For Covering:
  • 3 bowl Rice flour 
  • 2 tbsp Wheat flour
  • 1 tsp Oil
  • A pinch of Salt
  • 3 bowl Water
  • Few drops of Yellow & Green food colour 
For Stuffing:
  • 1 bowl Coconut (grated)
  • 1 bowl Split Chickpeas (Chanadal)
  • 1.5 bowl Jaggery chopped/ Powder
  • 1 tsp Poppy seeds (roasted)
  • 2 tbsp Cashew nuts (chopped)
  • 1/4 tsp Cardamom powder
Method:

1) Wash Chanadal in a vessel. Add 2 bowl Water in it and pressure cook it for 3-4 whistles. When it cools down, pour the chanadal in the strainer and remove the excess water from it and keep it aside.


2) Heat a wok or a non-stick pan on medium flame. Add Jaggery in it. When it starts melting, add grated Coconut in it. Stir it and cook it for 2-3 minutes. Now, add cooked Chanadal in it, mix it well and cook it for some time. When the mixture gets dry and starts leaving the sides of the wok/ pan, remove it in a bowl. Add roasted Poppy seeds, Cashew nuts and Cardamom powder in it. Mix it well and keep it aside.

3) Boil water in a large vessel and add 1 tsp Oil and Salt in it. Once the water is boiled, put off the flame and add Rice flour and Wheat flour in it and mix it well. Cover it with a lid for 10-15 minutes. Divide the mixture in two portions. Add Yellow and Green colour in each part. Knead a smooth dough and keep it aside. While kneading, you can add very little water to knead the dough.
 Now again divide the two coloured dough in small portions. Take two small parts of each colour and join it together. Roll them with rolling pin like a puri. Now fill the stuffing in the centre of puri. Fold all four sides and shape it like envelopes or as shown in the picture. Repeat the same procedure with all remaining dough.



4) Heat water in a steamer or cooker. Place a greased plate and place the uncooked Dindas on it. Steam it for 12-15 minutes. 



5) Serve delicious Fusion Dinda with Ghee.

Comments

  1. फार सुंदर एकदा सवड काढून करेन.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.... नक्की करून बघा आणि कळवा.

      Delete

Post a Comment

Popular Posts