नारळाच्या वडया/ Naralachya vadya/Coconut barfi
साहित्य:
कृती:
१) खोवलेला नारळ, साखर व दूध एकत्र करून मिक्सरमधून फिरवून थोडेसे बारीक वाटून घ्या.
२) एका 'ट्रे' ला किंवा थाळीला तूप लावून घ्यावे.
३) एका नाॅन-स्टीक पॅनमध्ये नारळाचे मिश्रण घेऊन त्यात एक टेबलस्पून तूप घालून मिश्रण मध्यम आंचेवर ठेवून १५-२० मिनटं ढवळत रहावे, मिश्रण आटत आल्यावर त्यात मिल्क पावडर व मिल्क मसाला घालावा. थोडे थोडे तूप घालून सतत ढवळत रहा. मिश्रण घट्टसर होत आले की, १ टीस्पून पीठीसाखर घालावी. तयार मिश्रणाचा घट्ट गोळा झाला की, 'ट्रे' /थाळी मध्ये मिश्रण घालून एकसारखे पसरवून वड्या पाडा.
४) थंड झाल्यावर वड्या डब्यात भरून ठेवा.
- ३ वाट्या खोवलेला नारळ
- ३ वाट्या साखर
- १/२ कप दूध
- दीड वाटी मिल्क पावडर
- ३-४ थेंब व्हॅनिला इसेन्स किंवा १/२ टीस्पून वेलची पावडर
- १ टेबलस्पून मिल्क मसाला ( ऐच्छिक)
- साजूक तूप आवश्यकतेनुसार
- १ टीस्पून पीठीसाखर
कृती:
१) खोवलेला नारळ, साखर व दूध एकत्र करून मिक्सरमधून फिरवून थोडेसे बारीक वाटून घ्या.
२) एका 'ट्रे' ला किंवा थाळीला तूप लावून घ्यावे.
३) एका नाॅन-स्टीक पॅनमध्ये नारळाचे मिश्रण घेऊन त्यात एक टेबलस्पून तूप घालून मिश्रण मध्यम आंचेवर ठेवून १५-२० मिनटं ढवळत रहावे, मिश्रण आटत आल्यावर त्यात मिल्क पावडर व मिल्क मसाला घालावा. थोडे थोडे तूप घालून सतत ढवळत रहा. मिश्रण घट्टसर होत आले की, १ टीस्पून पीठीसाखर घालावी. तयार मिश्रणाचा घट्ट गोळा झाला की, 'ट्रे' /थाळी मध्ये मिश्रण घालून एकसारखे पसरवून वड्या पाडा.
४) थंड झाल्यावर वड्या डब्यात भरून ठेवा.
Mast...👍😋
ReplyDelete