गाजराचे लोणचं

आता बाजारात मस्त लाल गाजर मिळतात. लाल गाजर पाहून गाजर हलवा करावा ,गाजराच्या वड्या, गाजराची खीर, गाजराची कोशिंबीर की गाजराचे लोणचं करावं? हाच प्रश्न पडतो. आज गाजराचे लोणचं करूया असं ठरवलं आणि तयारीला लागले. घरात सगळे साहित्य सहज उपलब्ध होतेच म्हणून अगदी १५-२० मिनिटात लोणचं तयार सुध्दा झाले. वेळ वाचवण्यासाठी, मी गाजर बारीक चिरायला चाॅपर वापरले. तुम्ही गाजराचे बारीक तुकडे करायला फूड प्रोसेसर वापरू शकता किंवा बारीक चिरून/किसुन घेऊ शकता. गाजराच्या लोणच्याची रेसिपी देत आहे आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा. 

गाजराचे लोणचं 

साहित्य:

  • २५० ग्रॅम लाल गाजर
  • १/२ वाटी लिंबाचा रस/ २-३ लिंबाचा रस
  • १/२ वाटी तयार लोणचं मसाला
  • ३ टीस्पून लाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती:

१) गाजर धुवून घ्यावीत. गाजराचे सालं काढून बारीक चिरून किंवा किसून घ्यावीत.

२) एका कढईत तेल चांगले तापवून, गार करून घ्या.

२) एका भांड्यात बारीक चिरलेले गाजर, लोणचं मसाला, लाल तिखट, लिंबाचा रस व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.

३) गाजराच्या मिश्रणात गार झालेले तेल घालून मिश्रण एकत्र करा. गाजराच्या तयार लोणच्याच्या वरती थोडे तेल ठेवा म्हणजे लोणचं टिकते.


४) गाजराचे लोणचं फ्रिझमध्ये ठेवावे. 





Comments

Post a Comment

Popular Posts