मुगडाळ खिचडी / Moongdal-Khichadi
मूगडाळ खिचडी
साहित्य:
साहित्य:
- १ वाटी तांदुळ
- १/२ वाटी मूगडाळ
- १ मध्यम कांदा चिरलेला
- १ मध्यम बटाटा
- १ टीस्पून धने पावडर
- २ टीस्पून गोडा मसाला
- ५-६ कढीपत्याची पानं
- १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
- मीठ चवीनुसार
- थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी:
- २ टेबलस्पून तेल
- १/४ चमचा मोहरी,
- १/४ चमचा हळद व चिमुटभर हिंग
कृती:
१) तांदुळ व मूगडाळ एकत्र करून धुवून बाजूला ठेवून द्या.
२) एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. फोडणीत कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे व चिरलेला कांदा व बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी चिरून घालाव्यात. कांदा व बटाटा थोडा लालसर झाल्यावर त्यात धुतलेले तांदुळ व मूगडाळ घालून २-३ मिनिटे परता. त्यात धने पावडर, गोडा मसाला घालून मिश्रण एकत्र करून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालून तांदुळ व मूगडाळ शिजवा.
३) आपल्या आवडीनुसार मऊसर होईपर्यंत खिचडी शिजवून घ्या. खिचडी शिजवतांना त्यात थोडी चिरलेली कोथिंबीर घाला. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.
४) झणझणीत लसुण फोडणी करतांना, फोडणीत भरपूर लसूण पाकळ्या, मोहरी, हिंग व लाल तिखट घालून खमंग फोडणी करा.
४) गरमागरम खिचडी तूप घालून किंवा झणझणीत लसुण फोडणी व चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
Comments
Post a Comment