ताकाची कढी/ Takachi kadhi/ Maharashtrian Kadhi

ताकाची कढी

साहित्य:


  • ३ वाट्या ताक
  • १ टेबलस्पून चणाडाळीचे पीठ
  • १ टीस्पून किसलेले आलं
  • ५-६ लसूण पाकळ्या ठेचलेल्या
  • २-३ चमचे साखर
  • चवीनुसार मीठ


फोडणीसाठी:


  • २ टीस्पून तेल/तूप
  • १/४ चमचा मेथी
  • १/४ चमचा जिरं
  • ५-६ कढिपत्याची पानं
  • १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे


कृती:

१) एका भांड्यात ताक घ्या. चणाडाळीचे पीठात थोडे पाणी घालून पेस्ट करून ताकात घाला. ताकामध्ये आलं, साखर व चवीनुसार मीठ घालून मध्यम आंचेवर उकळवा.

२)एका कढईत तेल/तूप तापवून त्यात लसुण पाकळ्या, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता व हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करून ताकात घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा.

३) गरमागरम ताकाची कढी सर्व्ह करा. 




Comments

Popular Posts