कोबीची पचडी किंवा कोबीची कोशिंबीर/cabbage Salad
कोबीची पचडी किंवा कोबीची कोशिंबीर
साहित्य:
- २ वाट्या बारीक चिरलेला कोबी
- १ मध्यम कांदा चिरलेला
- १ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट
- १/२ लिंबाचा रस
- थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
- २ टीस्पून साखर
- चवीनुसार मीठ
- २ टीस्पून तेल
- १/४ चमचा मोहरी, हळद व चिमुटभर हिंग
१) एका भांड्यात बारीक चिरलेला कोबी ,चिरलेला कांदा, शेंगदाण्याचं कूट, साखर, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
२) एका छोट्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद व हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करा. तयार फोडणी कोबीच्या मिश्रणात घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
३) तयार कोबीची पचडी किंवा कोबीची कोशिंबीर सर्व्ह करा.
Comments
Post a Comment