लिंबू व हिरव्या मिरचीचे लोणचं (खाराची मिरची)
लिंबू व हिरव्या मिरच्यांचे लोणचं (खाराची मिरची)
साहित्य:
१) हिरव्या मिरच्या घेतांना कमी तिखट घ्याव्यात. हिरव्या मिरच्यांची देठं मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्या. ४-५ लिंबाच्या फोडी करून घ्या. उरलेल्या लिंबाचा रस काढून घ्या. १ वाटी लिंबाचा रस असावा.
२) मेथीदाणे तळून घ्या. तळलेले मेथीदाणे, मोहरीची डाळ, हळद व हिंग एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून लोणचं मसाला तयार करून घ्या. त्यात तयार मिरची लोणचं मसाला (ऐच्छिक) घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
३) हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, लिंबाच्या फोडी, १ वाटी लिंबाचा रस, लोणचं मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
४) एका कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल चांगले तापले की गॅस बंद करा. तेल व्यवस्थित गार झाल्यावर मिरचीच्या मिश्रणात टाका.
५) तयार लोणचं काचेच्या बरणीत ठेवा. लोणच्याच्या वरती १/२ इंच तेलाचा थर असावा, म्हणजे मिरचीचे लोणचं बरेच दिवस टिकते.
साहित्य:
- २५० ग्रॅम हिरव्या मिरच्या
- १०-१२ लिंब
- १/२ टीस्पून मेथीदाणे
- १ वाटी मोहरीची डाळ
- १/२ टीस्पून हळद
- १/४ टीस्पून हिंग
- १/२ वाटी तयार मिरची लोणचं मसाला (ऐच्छिक)
- चवीनुसार मीठ ( मी अंदाजे ३/४ वाटी मीठ वापरले)
- तेल आवश्यकतेनुसार
१) हिरव्या मिरच्या घेतांना कमी तिखट घ्याव्यात. हिरव्या मिरच्यांची देठं मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्या. ४-५ लिंबाच्या फोडी करून घ्या. उरलेल्या लिंबाचा रस काढून घ्या. १ वाटी लिंबाचा रस असावा.
२) मेथीदाणे तळून घ्या. तळलेले मेथीदाणे, मोहरीची डाळ, हळद व हिंग एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून लोणचं मसाला तयार करून घ्या. त्यात तयार मिरची लोणचं मसाला (ऐच्छिक) घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
३) हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, लिंबाच्या फोडी, १ वाटी लिंबाचा रस, लोणचं मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
४) एका कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल चांगले तापले की गॅस बंद करा. तेल व्यवस्थित गार झाल्यावर मिरचीच्या मिश्रणात टाका.
५) तयार लोणचं काचेच्या बरणीत ठेवा. लोणच्याच्या वरती १/२ इंच तेलाचा थर असावा, म्हणजे मिरचीचे लोणचं बरेच दिवस टिकते.
Comments
Post a Comment