भरली भेंडी/ Stuffed Okra (Bharali Bhendi)



"भरली भेंडी" वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. काही जण चणाडाळीचे पीठ, दाण्याचे कूट व इतर मसाले वापरून मसाला करतात व भेंडी मध्ये भरून भरली भेंडी करतात. माझी एक मैत्रिण नारळ, लसूण, मिरची, आमसुलं घालून भरली भेंडी करते, या मसाला भेंडीची चव छानच लागते. अगदी मोजक्याच साहित्यात तयार होणारी व चवीत बदल हवा असेल तर, या पद्धतीने भरली भेंडी नक्की करून बघा. तुम्ही अशी भेंडी स्टार्टर म्हणूनसुद्धा वाढू शकता. पाहूया कशी करायची "भरली भेंडी".


रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.

साहित्य:
  • २०० ग्रॅम कोवळी भेंडी 
  • १/२ नारळ (खोवलेला)
  • १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • १-२ आमसुलं
  • २-३ लसूण पाकळ्या 
  • १-२ हिरव्या मिरच्या 
  • मीठ चवीनुसार
कृती:

१) भेंडीचे देठ व टोक कापून टाका व मसाला भरण्यासाठी भेंडीच्या मधोमध चीर द्या.



२) खोवलेला नारळ, कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या, आमसुलं व चवीनुसार मीठ घालून पाणी न घालता मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या.



३) एका कढईत तयार मिश्रण २-३ मिनिटे थोडे परतून घ्या व गार करा. (हा मसाला भेंडीमध्ये भरण्यासाठी तयार झाला).  तयार मसाला, भेंडी मध्ये भरा.



४) एका नॉन-स्टिक पॅनमध्ये किंवा तव्यावर थोडे तेल घालून, त्यात मसाला भरलेल्या भेंड्या ठेवून त्यावर झाकण ठेवा. १-२ मिनिटांनी झाकण काढून भेंडीची दुसरी बाजू सुद्धा शेकून घ्या. मध्यम आंचेवर भेंडी शिजवा.  



५) चविष्ट "भरली भेंडी" भेंडी सर्व्ह करा.

# Stuffed Okra (Bharli Bhendi) #



Okra/ Lady finger is favorite among all people. Different types of stuffings are used while preparing "Stuffed Okra". It is stuffed with Besan, Peanut powder and different types of Masale. Today, I am sharing a different recipe, in which Coconut, Coriander, Green Chili, Kokum, etc. is used for stuffing. Using limited ingredients, one can prepare this recipe very easily and quickly. Let's see the recipe.

If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog. 

Ingredients:
  • 250 grams Okra / Lady Finger
  • 1/2 shell of Coconut (grated)
  • 1/3 cup chopped Coriander leaves
  • 1-2 Green chilies
  • 1-2 Kokum
  • 2-3 Garlic cloves 
  • Salt as per taste
Method:

1) First, wash the Okra and let it dry. Chop both ends of Okra. Cut each Okra lengthwise in the middle, for filling the masala or stuffing.


2)For stuffing, grind grated Coconut, Coriander leaves, Green Chilies, Kokum, Garlic cloves and Salt as per taste, together in mixer without adding water and keep it aside.


3) Heat a pan and sauté ground stuffing for 2-3 minutes and let it cool. We will use this masala as our stuffing. Stuff each Okra with masala (Stuffing)


4) Heat little Oil in a non-stick pan or tava. Place few stuffed Okra for frying. Cover it with a lid for 1-2 minutes and cook it on medium flame. If required, smear some Oil on it. Fry both the sides of Okra until it is cooked nicely. 


5) Now, tasty Stuffed Okra is ready to be served.

Comments

Popular Posts