आंब्याचा शिरा / Mango Sheera
कोकणचा राजा हापूस आंबा. त्याचे आगमन होताच हापूस आंब्याचा जणू महोत्सव सुरु होतो. प्रत्येक घरात हापूस आंब्याचे विविध प्रकार करायला सुरुवात होते. एखाद्या गोड पदार्थामध्ये हापूस आंब्याचा रस घातला की त्या पदार्थाला राजेशाही रूपच येतं, नाही का? हापूस आंब्यापासून तयार केलेला साखरांबा, आंबा बर्फी, मँगो मस्तानी, मँगो आइस्क्रीम/ कुल्फी असो किंवा अगदी 'आंब्याचा शिरा', असे एकापेक्षा एक स्वादिष्ट पदार्थ हापूस आंब्यापासून केले जातात. प्रसादाचा शिरा तर आपण नेहमीच करतो, पण त्यात थोडा बदल करून आमरसातील शिरा तयार होतो. असा हा आंब्याच्या शिरा सगळ्यांना नक्कीच आवडेल. करायला अगदी सोपा व पटकन तयार होणारा असा हा राजेशाही पदार्थ- 'आंब्याचा शिरा '. पाहूया याची रेसिपी.
रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
साहित्य:
- १ कप जाडा रवा
- १ कप हापूस आंब्याचा रस
- १ कप साखर
- साजूक तूप जरुरीनुसार
- २-३ टेबलस्पून दूध मसाला (ऐच्छिक )
- १०-१२ काजूचे तुकडे
- १५-२० बेदाणे
- १/४ चमचा वेलची पावडर
- १/४ कप दूध
- थोडेसे केशर
- चिमुटभर मीठ
कृती:
१) एका पातेल्यात २-३ कप पाणी उकळत ठेवा.२) एका कढईत ३-४ टेबलस्पून साजूक तूपावर रवा ५-६ मिनिटे खमंग भाजून घ्यावा.
३) भाजलेल्या रव्यामध्ये चिमुटभर मीठ व उकळीचे पाणी घालून रवा फुलवून घ्यावा. रवा कोरडा वाटल्यास अजून थोडे पाणी घालावे. (उकळीचे पाणी घातल्याने रवा छान फुलतो). मिश्रणावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. नंतर मिश्रणात साखर, आंब्याचा रस घालून मिश्रण एकत्र करून घ्या व पुन्हा झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
४) मिश्रणात दूध मसाला, वेलची पावडर, काजूचे तुकडे व बेदाणे घालून मिश्रण एकत्र करून घ्या. १/४ कप दुधात थोडेसे केशर एकत्र करून मिश्रणात घाला. थोडेसे साजूक तूप सोडून मिश्रण ढवळून पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
५ ) गरमा-गरम आंब्याचा शिरा सर्व्ह करा.
# Mango Sheera #
"Alphonso Mango" is the King of fruits. When its season starts, mangoes are easily available in local market. I guess there would hardly be anyone in the world, who would not like the taste of Alphonso Mango. One can prepare various dishes like Mango Mastani, Mango Ice-cream/Kulfi, Mango Burfi, etc. using Alphonso Mango. When any sweet dish is prepared with Alphonso Mango, it gives us the taste of a royal sweet dish. We love it's colour and aroma. Let's see the recipe of this simple and easy dish.
If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.
Ingredients:
- 1 cup Semolina (Rava)
- 1 cup Alphonso Mango pulp
- 1 cup Sugar
- Pure ghee as required
- 2-3 tbsp Milk Masala (optional)
- 10-12 Cashew nuts
- 15-20 Raisins
- 1/4 tsp Cardamom powder
- 1/4 cup Milk
- A pinch of Kesar
- A pinch of Salt
Method:
1) In a vessel, keep 2-3 cups of water for boiling.
2) Heat a pan on medium high flame. Add Ghee and Semolina in it. Stir the mixture continuously and roast semolina for 5-6 minutes or until it turns light brown.
3) Add boiling water and a pinch of Salt in mixture. Mix it well, cover it with a lid and cook it for 2-3 minutes (add more water if needed). Now, add Sugar and Mango pulp and again mix it well. Once again, cover it with a lid and cook it.
4) Add Cashew nuts, Raisins, Cardamom powder and 1 tbsp Ghee. Add Kesar in the milk & mix it well and add it to the mixture. Cover it with a lid and cook it for 2-3 minutes.
5) Now your delicious Mango Sheera is ready to serve.
😋😋😋👌
ReplyDelete