मिक्स डाळींचे आप्पे / Mix Dal Appe



"आप्पे" हा प्रकार, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो. "मिक्स डाळींचे आप्पे" करायला अतिशय सोपे आहेत. यात सगळ्या प्रकारच्या डाळी असल्याने, आपल्याला यातून प्रोटीन मिळते. नाश्त्याकरीता हा पोटभरीचा व पौष्टीक प्रकार आहे. लहान मुलांना हा प्रकार शाळेच्या डब्यासाठी सुद्धा देता येतो. आप्पे करतांना त्यात आलं व मिरची घातल्याने वेगळी चटणी नसली तरी नुसते सुद्धा छान लागतात. सगळे साहित्य घरातच उपलब्ध असतेच. याच पिठापासून आपल्याला  मिक्स डाळींचा ढोकळा पण करता येतो. पाहू या आप्पे करायची पाककृती.

रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.

*सर्व्हिंग: ४ माणसांसाठी 
*तयार करण्याचा वेळ : २५-३० मिनिटे 

साहित्य:
  • १ वाटी चणाडाळ
  • १ वाटी उडिदडाळ
  • १ वाटी तूरडाळ
  • १ वाटी मूगडाळ
  • १ वाटी मसूरडाळ
  • १ वाटी इडली रवा
  • १ वाटी जाडे पोहे
  • १ टीस्पून फ्रुट सॉल्ट (इनो)
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मीठ चवीनुसार
  • फोडणीसाठी: १ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी, १/२ टीस्पून जिरं, थोडासा हिंग, १-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ७-८ कडीपत्त्याची पाने चिरलेली 
कृती:
१) वरील सगळ्या डाळी, इडली रवा व पोहे एकत्र करून धुवून ३-४ तास भिजवा. नंतर त्यातील पाणी काढून  भिजवलेले मिश्रण मिक्सरवर बारीक वाटा. आवश्यकता असल्यास थोडेसे पाणी घाला. वाटलेले पीठ पळीने पडेल इतपत पातळ असावे. तयार पीठ एका मोठ्या भांड्यात काढून उबदार ठिकाणी ७-८ तास आंबवण्याकरिता झाकून ठेवा.

२) एका छोट्या कढईत १-२ टेबलस्पून तेल तापवून, त्यात  मोहरी, जिरं, हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे, ७-८ कडिपत्याची पानं (चिरलेली) घालून फोडणी करा. तयार पीठात आलं व मिरचीची पेस्ट, फोडणी, मीठ व १ टीस्पून इनो घालून, मिश्रण एकत्र करून घ्या. (आवडत असल्यास त्यात मक्याचे दाणे, चिरलेले गाजर किंवा मटार सुद्धा घालू शकता).


३) आप्पे-पात्र  मध्यम आंचेवर तापत ठेवावे. त्यात १/२ चमचा तेल सोडून, आप्पे पात्रात मिश्रण घालावे व त्यावर २-३ मिनिटे झाकण ठेवावे. एका बाजूने आप्पे तयार झाल्यावर उलटावे व दोन्ही बाजूंनी थोडे थोडे तेल सोडून सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे. गरम-गरम आप्पे टोमॅटो केचप किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे.


*आप्पे करताना आप्पे पात्र नॉन-स्टिकचे असावे. त्यात आप्पे चिकटत नाहीत, सहज निघतात.



# Mix Dal Appe #



*Serving for 4 persons

*Cooking time: 25-30 minutes

"Mix Dal Appe" is a 
Protein-rich breakfast. You can also serve it as an evening snack. All ingredients are easily available in our kitchen. All age group people love to have it.  When your kids do not like to eat vegetables, you can add them in it, to make a more healthy snack. This is also a good option for school tiffin. If you add Ginger and Green Chilies in it, you need not make Chutney separately. You can also prepare "Mix Dal Dhokla" with the same batter. Let's see the recipe of tasty and delicious "Mix Dal Appe".

If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog. 

Ingredients:
  • 1/2 Cup Bengal Gram dal / Chana dal 
  • 1/2 Cup Black Gram Dal/ Udid dal
  • 1/2 Cup Red Lentil Dal/ Masoor Dal
  • 1/2 Cup Pigeon Gram/ Tuvar Dal
  • 1/2 Cup Green Gram Dal/ Moong Dal
  • 1/2 Cup Flattened Rice
  • 1/2 Cup Idli Rava
  • 1 tsp Fruit Salt (Eno)
  • Oil as required
  • Salt as per taste
  • For Tempering: 1 tbsp Oil, 1/2 tsp Mustard seeds, 1/2 tsp Cumin seeds, a pinch of Asafoetida, 1-2 chopped Green Chilies, 6-7 Curry Leaves (chopped)
Method:

1) Wash all Dals, Flattened Rice & Idli Rava and soak them in water for 3‌-4 hours. Then drain the water and grind the mixture in a mixer. Add sufficient water to make a smooth and fine paste. Batter should be of spoon-drop consistency. Keep the ground batter in a large vessel and place it in a warm place for 7-8 hours, for fermentation. Keep enough space in the vessel for the batter to rise.

2) Heat Oil in a pan and add Mustard seeds in it. When it sputters, add Cumin seeds, Asafoetida, chopped Green Chilies and chopped Curry Leaves in it. Add this tempering to the batter. Now add Chili and Ginger pasteSalt and Eno in it and mix it well.


3) Heat the Appe mould on medium heat and grease it with some Oil. Pour 1 spoonful mixture in it and cover it with a lid for 2-3 minutes. Turn each Appe upside down with the help of  spoon and smear some Oil on it. Cook them till it turns light brown colour from both sides. 

4) Serve tasty Appe with Tomato Ketchup or Chutney.

Comments

  1. Can v use normal rava..vll d taste change

    ReplyDelete
    Replies
    1. I haven't used normal Rava yet, but you can use Rice instead of Rava.

      Delete

Post a Comment

Popular Posts