कैरीचं लोणचं/ Raw Mango Pickle
'कैरीचं लोणचं' म्हटलं की तोंडाला लगेच पाणी सुटतं. माझ्याकडे कैरीचं लोणचं हे घावन, थालीपीठ, मऊ भात किंवा अगदी गोड शिरा केला तरी त्या बरोबर आवडीने खाल्लं जातं. 'कैरीचं लोणचं' संपूर्ण भारतात वेगवेगळया पद्धतीने केलं जातं. कैरीचं गोड लोणचं किंवा तिखट लोणचं करतात. लोणच्यांमध्ये मोहरीचे तेल, तिळाचे तेल किंवा शेंगदाणा तेल वापरले जाते. काही जण लोणच्यांमध्ये बडीशोप, लवंग, गूळ, मोहरीची डाळ, मेथी पावडर, लाल तिखट इत्यादींचा वापर करतात. जसा प्रदेश बदलतो तसं लोणचं करायची पद्धत पण बदलते. कैरीचं लोणचं वर्षभर टिकेल असेही करतात. पण पटकन लोणचं खाता यावं म्हणून कैरी बारीक चिरून किंवा किसून लोणचं केलं तर लगेचच लोणच्याचा आस्वाद घेता येतो. पाहू या कैरी बारीक चिरून केलेले 'कैरीचं लोणचं', अगदी सोपं व लगेच मुरणारं.
रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
साहित्य:
- २ मध्यम कै-या
- ३-४ टेबलस्पून तयार लोणचं मसाला
- २ टीस्पून लाल तिखट
- ३-४ टेबलस्पून तेल
- मीठ चवीनुसार
१) कैरीच्या बारीक फोडी चिरून घ्याव्यात. एका भांड्यात/ बाऊलमध्ये कैरीच्या फोडी, तयार लोणचं मसाला, लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
३) तयार लोणचं काचेच्या बरणीत ठेवा. १-२ दिवसात लोणचं मुरतं. आयत्या वेळी खायला पटकन तयार होतं. लोणचं जास्त दिवस टिकावे म्हणून फ्रीझमध्ये ठेवा.
# Raw Mango Pickle #
"Raw Mango Pickle" is one of the mouth watering side dishes. We have it with Ghavan, Thalipeeth (Savoury multigrain flat Bread) or even Sweet Sheera. This is prepared in variety of methods all over India. It can be either sweet or spicy. It can be prepared in Mustard Oil, Sesame Oil or Groundnut Oil. Some of them use Fennel, Clove, Jaggery, Mustard Dal, Fenugreek seed Powder, etc. also in it. Normally, it is said that if Pickle is preserved for a longer period, it tastes even better. However, it needs patience, which is lacking now a days. In view of this, if instant Pickle is prepared with finely chopped or grated Raw Mango, it can be had immediately. Let's see the recipe.
If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.
Ingredients:
- 2 Medium sized Raw Mango
- 3-4 tbsp ready made Pickle Masala
- 2 tsp Red Chili powder
- 3-4 tbsp Oil
- Salt as per taste
1) Finely chop the Raw Mangoes. In a mixing bowl, add chopped Raw Mangoes, Pickle Masala, Red Chili powder and Salt as per taste and mix it well.
2) Heat Oil in a pan. Keep it aside and let it cool down. Now pour the Oil in mixing bowl and mix the pickle nicely.
3) Keep the Mango pickle in a jar. Pickle get's ready to eat within 1-2 days. Store it in the refrigerator.
🤤yummy
ReplyDelete