मूग भजी/ Moongdal Fritters/ Moongdal Bhajiya/ Pakora




मनमुराद कोसळणारा पाऊस, गरमागरम भजीची (नव्हे "भज्यांची") प्लेट, वाफाळता चहा, आराम-खुर्चीची बैठक आणि होम थिएटर वरून निघणारे जगजितसिंग किंवा गुलाम अली साहेबांच्या गजल चे स्वर, अहाहा!! मित्रांनो, कसं वाटलं हे समीकरण? हे समीकरण प्रत्येकाच्या आयुष्यात कमीतकमी वर्षातून एकदा तरी जुळून यायलाच हवे. पाऊस पडला की, भजी हि हवीतच नाही का? मग भजी पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन खाल्ली काय किंवा अगदी हातगाडीवर खाल्ली  काय? भजी हि भजीच असतात. भजी हा एक नाश्ता प्रकार असून घराघरात आवर्जून केला जातो. बहुतेक वेळा चणाडाळीच्या मिश्रणात भाज्यांचे पातळ काप बुडवून तेलात तळतात व भजी करतात.

"मूग भजी" करतांना मात्र मूगडाळ भिजवून, भरड वाटून, त्यात मिरे, बडीशेप, धने, मिरची व कांदा घालून मिश्रण तयार करून तेलात तळतात.  मूगडाळीची भजी बाहेरून कुरकुरीत तर आतून मऊसर असतात आणि खातांना मिरे, बडीशेप व धने यांचा स्वाद छान लागतो. मूगभजी, वाफाळता चहा व पाऊस असेल तर क्या बात है? मूग भजी करण्यासाठी लागणारे साहित्य घरात नेहमीच उपलब्ध असते. पाहू या "मूग भजी" करण्याची पाककृती.

रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.

साहित्य:

  • १/२ कप मूगडाळ    
  • १ मध्यम कांदा
  • ८-१० काळे मिरे
  • १ टीस्पून धने
  • १ टीस्पून बडीशोप
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • १" आलं
  • १/२ टीस्पून हळद
  • १/४ हिंग
  • मीठ चवीनुसार
  • चिमुटभर खायचा सोडा
  • तळण्यासाठी तेल



कृती: 

१) मूगडाळ नीट धुवून घ्या. त्यात २-३ वाट्या पाणी घालून २-३ तास भिजवून ठेवा. नंतर मूगडाळीतील पाणी काढून, मूगडाळ मिक्सरमध्ये भरड वाटून घ्या. (गरज वाटल्यास थोडेसे पाणी घाला).
२) काळे मिरे, धने व बडीशोप मिक्सरमध्ये भरड वाटून मसाला करून घ्या. आलं व हिरव्या मिरच्या वाटून घ्या व कांदा उभा चिरून घ्या.

३) एका भांड्यात वाटलेली मूगडाळ, उभा चिरलेला कांदा, भरड वाटलेला मसाला, आलं-मिरच्यांची पेस्ट, हळद, हिंग, चवीनुसार मीठ व चिमुटभर खायचा सोडा घालून मिश्रण एकत्र करून घ्या. 


४) एका कढईत मध्यम आंचेवर तेल तापवून घ्या. एका चमच्याने किंवा हाताने छोटी छोटी भजी करून गरम तेलात अलगद सोडा. एका वेळी ८-१० भजी तेलात सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भजी तळून घ्या. 



५) तळलेली भजी टिश्यू पेपर वर काढून ठेवा. 



६) गरमागरम "मूग भजी", लसूण चटणी / हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा.


# Moongdal Fritters #



In India, Fritters/Pakora is a popular fried snacks served with tea. Foodies love to eat Fritters anywhere, may it be a big Restaurant or a Handcart on the roadside. Normally, Potato, Banana, Paneer, Spinach fritters are made in chick pea flour's (Besan) batter, sprinkled with some spices and deep fried in oil. For preparing Moongdal Pakora, Besan batter is not required. For Moongdal Fritters, one has to soak and coarsely grind Moongdal with spices and then deep frying them in Oil. Moongdal Fritters are crispy outside and soft inside. Moongdal Fritters are very tasty and are generally served with Green Chutney. Preparation of Moongdal Fritters is very easy and the required ingredients are easily available at home or in stores. Let's see the recipe.

If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog. 


Ingredients:

  • 1/2 cup Moong Dal
  • 1 medium sized Onion (lengthwise chopped)
  • 8-10 Black Pepper
  • 1 tsp Fennel (Sauf)
  • 1 tsp Coriander seeds
  • 4-5 Green Chilies
  • 1" Ginger
  • 1/2 tsp Turmeric powder
  • 1/4 tsp Asafoetida
  • Salt as per taste
  • A pinch of Baking Soda
  • Oil for frying

Method:

1) Wash and soak Moong Dal for 2-3 hrs. Then coarsely grind it in a mixer without water (just add little water, if required).


2) Coarsely grind Black Pepper, Fennel (Sauf) and Coriander Seeds and make Masala to add in the mixture. Coarsely grind, Green Chilies and Ginger. Keep it aside.


3) In a large mixing bowl, add ground Moongdal, chopped Onion, ground Masala, Turmeric Powder, Asafoetida, a pinch of Baking Soda and Salt as per taste, in it and mix it well.


4) Heat Oil in a Kadhai or Wok for frying Fritters. Now slowly drop the batter 
in hot Oil with the help of a small spoon. Deep fry the Moongdal Fritters on medium flame, till it turns golden brown from both the sides. Add a batch of 8-10 Fritters at a time. 

5) Remove them with slotted spoon, place them on a tissue paper and then keep them aside. Now deep fry all remaining Moongdal Fritters in hot Oil.


6) Serve hot "Moongdal Fritters" with Garlic Chutney/ Green Chutney.

Comments

Post a Comment

Popular Posts