काॅर्न मसाला /Corn Masala

सकाळी मंडईत गेले असता, छान टपो-या, कोवळ्या दाण्यांची पिवळी धमक मक्याची कणसं नजरेस पडली आणि कणसं घेण्याचा मोह काही केल्या आवरता येईना. मग काय घेतली २-३ कणसं. मस्त पावसात गरमा-गरम भाजलेले मक्याचे कणीस तर सगळ्यांनाच आवडते. पावसात भिजत भिजत, कोळश्याच्या शेगडीजवळ उभं राहून खरपूस भाजलेले मक्याचे कणीस खायला तर चविष्ट लागते आणि त्यावर लिंबाच्या फोडीने लावलेले तिखट व मीठ, अहाहा!! आमच्या घरी मका घरी आणला की, कधी संपतो ते कळतंच नाही. मग मक्याचे कटलेट, मक्याची भजी, मक्याचे सूप, काॅर्न चाट, काॅर्न पुलाव, काॅर्न सॅन्डवीच असे नानाविध "सर्वात्मका "( सर्वात मका ) प्रकार केले जातात. या सगळ्या पदार्थांप्रमाणे माझ्याकडे "काॅर्न मसाला" सगळे जण आवडीने खातात. त्यामुळे "भाजी काय करावी?" हा प्रश्न चुटकी सरशी सुटतो. घरातील सगळीच मंडळी कणसं सोलायला तयार असतात. काॅर्न मसाला करतांना मी त्यात बदाम, काजू, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं लसूण, तिखट, मीठ यांचा वापर करते. बदाम, काजू घातल्याने ग्रेव्ही दाटसर व चवदार होते. असा हा चवदार 'काॅर्न मसाला' माझ्याकडे गरम-गरम पोळ्यांबरोबर चाटून पुसून फस्त होतो. असा हा स्वादिष्ट 'काॅर्न मसाला' कोणाला नाही आवडणार? चला तर मग पाहूया "काॅर्न मसाला" करायची पाककृती.

रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.


*सर्व्हिंग: ३-४ माणसांसाठी 
*करण्यासाठीचा वेळ: ३०-४० मिनिटे

साहित्य:
  • २ कप मक्याचे कोवळे दाणे
  • २ मोठे कांदे
  • १ मोठा टोमॅटो
  • ५-६ लसुण पाकळ्या
  • १-२ हिरव्या मिरच्या
  • १" आलं
  • ६-७ बदाम 
  • ६-७ काजू
  • १/४ टीस्पून हळद 
  • १/२ टीस्पून आमचूर 
  • २ टीस्पून धने पावडर 
  • २ टीस्पून लाल तिखट 
  • १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट 
  • १ टीस्पून साखर (ऐच्छिक)
  • तेल आवश्यकतेनुसार 
  • मीठ चवीनुसार
कृती:

१) कांदा उभा चिरून घ्या व टोमॅटोच्या मध्यम फोडी करून घ्या.


२) बदाम, काजू, हळद, काश्मिरी लाल तिखट व धने पावडर एकत्र करून मिक्सरवर बारीक पावडर याचा 'कोरडा मसाला' करून घ्या.

३) एक कढई तापवून थोड्या तेलावर कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या. त्यातच टोमॅटोच्या फोडी व लसूण पाकळ्या घालून पुन्हा २-३ मिनिटे परता. मिश्रण गार झाल्यावर त्यात आलं व हिरव्या मिरच्या घालून मिक्सरमध्ये बारीक वाटा. (गरज वाटल्यास थोडे पाणी वापरा). 'वाटलेला मसाला' बाजूला काढून ठेवा.


४) मक्याचे दाणे पाण्यात मीठ घालून उकडून घ्या. उकडलेले  मक्याचे दाणे चाळणीत काढून ठेवा.



५) एका कढईत ३-४ टेबलस्पून तेल तापवून, त्यात वाटलेला मसाला घालून मिश्रण ४-५ मिनिटे परता. त्यात कोरडा मसाला घालून पुन्हा १-२ मिनिटे परता.


६) वरील मिश्रणात उकडलेले मक्याचे दाणे व थोडे पाणी घालून ढवळा. त्यात काश्मिरी लाल तिखट, आमचूर, साखर (ऐच्छिक) व चवीनुसार मीठ घाला. ग्रेव्ही, तुमच्या आवडीनुसार दाटसर ठेवा.


















७) कॉर्न मसाल्याला एक उकळी येऊ द्या. 


८) गरम-गरम "कॉर्न मसाला" पोळी, नान किंवा तंदूरी रोटी बरोबर सर्व्ह करा.

Corn Masala #



In rainy season, 'Sweet Corn' is easily available in the market. Roasted Sweet Corn is one of the famous street snacks. When we feel the aroma of Roasted Corn, we can't resist ourselves from having it. Corn kernels are used for making variety of dishes, viz. Corn Cutlet, Corn Sandwich, Corn Pakoda, Corn Chat, Corn Pulav, etc. Likewise, with Corn kernels, I prepared "Corn masala". All of my family members help me to peel the Corn (Bhutta). They all love to have Corn masala with Roti. I use Onion, Tomato, Garlic, Green Chilies, Indian spices, Almonds, Cashew nuts, etc. in preparation. Almonds and Cashew nuts that help to thicken the gravy. Corn is healthy and nutritious too. Corn Masala is a spicy and a little tangy dish. All ingredients are mostly available in our kitchen or nearby stores. Let us now see the recipe for making Corn Masala. 

If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog. 

*Serving: 3-4 persons
*Preparation time: 30-40 minutes

Ingredients:
  • 2 cups tender and fresh Corn Kernels 
  • 2 big sized Onions
  • 1 big sized Tomato 
  • 5-6 Garlic Cloves
  • 1-2 Green Chillies
  • 1" Ginger 
  • 6-7 Almonds
  • 6- 7 Cashew nuts
  • 1/4 tsp Turmeric powder 
  • 1/2 tsp Amchur
  • 2 tsp Coriander powder 
  • 1 tsp Kashmiri Lal Mirchi Powder
  • 1 tsp Sugar (optional)
  • Oil as required 
  • Salt as per taste
Method:

1) Chop the Onions (lengthwise) and cut the Tomatoes in medium sized pieces. 



2) Grind Cashew nuts, Almonds, Turmeric powder and Coriander powder, together in mixer and make Dry Masala. 



3) Heat 1 tbsp Oil in a pan or wok and add chopped Onion in it. Sauté it for 4-5 minutes on medium flame till it turns golden brown. Now, add Tomato pieces & Garlic Cloves and sauté it again for 1-2 minute. Put off the flame and when it gets cool, grind a fine smooth paste in the mixer (use some water if required). Keep the ground masala aside.



4) Add a little bit of Salt in the water and boil the Corn in it. When it gets cooked, remove it on strainer and keep it aside. 



5) Now heat 3-4 tbsp Oil in a pan or wok. Add ground masala and sauté it for 4-5 minutes. Add ground dry masala and sauté it again for 1-2 minutes. 



6) Add Boiled Corn to the mixture. Add some water in the gravy. Now add Amchur, Kashmiri Lal Mirchi Powder, Salt as per taste and Sugar (optional). Add water and adjust its consistency as required.



7) When the mixture gets boiled, place it in a serving bowl.



8) Serve delicious "Corn Masala" with Roti, Naan or Tandoori Roti.


Comments

  1. व्वा व्वा खूपच छान झालाय ब्लॉग 👌👍😋. Good presentation with yummy pics

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts