टोमॅटो राईस



साहित्य:

  • २ वाट्या बासमती तांदूळ
  • १ मध्यम कांदा चिरलेला
  • ३-४ टोमॅटो
  • १ टीस्पून आलं व लसुण पेस्ट
  • १-२ हिरव्या मिरच्या
  • ५-६ कडिपत्याची पानं
  • २ टीस्पून धने पावडर
  • १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  • १/२ टीस्पून लाल तिखट
  • १ टीस्पून जिरं पावडर
  • २-३ टेबलस्पून तेल
  • १/४ चमचा मोहरी,थोडेसे जिरं व हिंग
  • मीठ चवीनुसार
कृती:

१) तांदुळ धुवून त्याचा मोकळा भात शिजवून घ्या. टोमॅटोच्या फोडी करून मिक्सरमध्ये टोमॅटोचा रस काढून घ्या.

२) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरं, हिंग व कडिपत्याची पानं घालून फोडणी करा. आलं- लसुण पेस्ट व हिरवी मिरचीला मधोमध चिरून फोडणीत घाला. बारीक चिरलेला कांदा घालून परता व टोमॅटोचा रस घालून मिश्रण उकळवा. थोडे घट्टसर झाल्यावर त्यात धने-जिरं पावडर, लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट, चवीनुसार मीठ व शिजवलेला मोकळा भात घालून २-३ मिनिटे परता. 


३) गरमागरम सर्व्ह करा.


Comments

Post a Comment

Popular Posts