कुळीथाचे पिठलं

कोकणातील सगळीकडे केला जाणारा, प्रत्येकाला आवडणारा, करायला सोपा, पटकन होणारा असा पदार्थ. 'कुळीथाचे पिठलं' किंवा 'पीठी' या नावाने कोकणात ओळखला जातो. त्याबरोबर तांदुळाची भाकरी, लसुण चटणी असेल तर मस्तच बेत.



साहित्य:


  • ३ टेबलस्पून कुळीथाचे पीठ
  • १ लहान कांदा चिरलेला
  • १-२ हिरव्या मिरच्या
  • ५-६ कडिपत्याची पानं
  • २-३ लसुण पाकळ्या बारीक चिरून/ ठेचून
  • १ टेबलस्पून जिरं व सुकं खोबरं (मिक्सरमध्ये बारीक केलेले)
  • १-२ कोकम
  • २ टेबलस्पून तेल
  • १/४ चमचा लाल तिखट (ऐच्छिक)
  • थोडीशी मोहरी, हिंग व हळद
  • चवीनुसार मीठ
  • सजावटीसाठी थोडासा खोवलेला नारळ 


कृती:

१) कुळीथाच्या पीठात २-३ वाट्या पाणी घालून पीठ कालवून घ्या.

२) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग ,हळद घालून फोडणी करा. त्यात चिरलेला लसुण, कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे, कडिपत्याची पानं, लाल तिखट घाला. कुळीथाचे तयार पीठ व चवीनुसार मीठ घालून मिश्रण १-२ मिनिटे ढवळा. जिरं खोबरं, कोकम घालून २-३ मिनिटे पिठलं उकळवा, गरज वाटल्यास थोडे पाणी घाला व पिठलं शिजू द्या. थोडासा खोवलेला नारळ घाला. गरमागरम भाकरी, कच्चा कांदा व लसुण चटणी बरोबर सर्व्ह करा.

Comments

  1. भाई sorry बेहन जबाब ही !!

    ReplyDelete
  2. Quick and easy Reciepe, Keep Posting, such Emergency exit Reciepes. . Thanks

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts