तवा पुलाव

साहित्य:
  • २ वाट्या बासमती तांदूळ
  • २ मध्यम आकाराचे टोमॅटो
  • १ उकडलेला बटाटा
  • १/२ वाटी मटार
  • १ मध्यम कांदा
  • १ छोटी सिमला मिरची
  • १ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट
  • २ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  • ३-४ टेबलस्पून तेल
  • १ टेबलस्पून लिंबाचा रस
  • १/२ टीस्पून चमचा जिरं
  • १/४ टीस्पून हळद
  • २ टीस्पून पावभाजी मसाला
  • १ टीस्पून गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • थोडेसे बटर
कृती:

१) तांदुळ धुवून त्याचा मोकळा भात शिजवून घ्या. 


२) कांदा, टोमॅटो, सिमला मिरची बारीक चिरून घ्या. उकडलेल्या बटाट्याचे तुकडे करून घ्या. एका कढईत तेल तापवून त्यात जिरं घाला व चिरलेला कांदा घालून परता. चिरलेला टोमॅटो व मटार घालून २-३ मिनिटे परता व मटार शिजवून घ्या. चिरलेली सिमला मिरची व बटाट्याच्या फोडी घालून पुन्हा २-३ मिनिटे परता.

३) तयार मिश्रणात आलं लसूण पेस्ट, हळद, काश्मिरी लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. २ टीस्पून पावभाजी मसाला व १ टीस्पून गरम मसाला (आवडीनुसार कमी जास्त वापरा) घालून १-२ मिनिटे परता. शिजवलेला भात ,थोडेसे बटर व १ टेबलस्पून लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करून १-२ मिनिटे वाफ द्या. 


४) बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.







Comments

Post a Comment

Popular Posts