कटाची आमटी

महाराष्ट्रात पुरणपोळी व कटाची आमटी हे पदार्थ होळी पौर्णिमेच्या दिवशी केले जातात. पुरणाकरिता चणाडाळ शिजवतांना त्यातील डाळीपासून वेगळे काढलेले पाणी म्हणजे "कट". याची आमटी करतात. कटाची आंबट-गोड आमटी व त्याला खमंग गरम मसाल्याची फोडणी फारच छान लागते. 

साहित्य:

  • ३-४ वाट्या पुरणाचा कट
  • १/२ वाटी चिंचेचा घट्टसर कोळ
  • २ टेबलस्पून चिरलेला गूळ
  • १/४ वाटी पुरण
  • २‌-३ टेबलस्पून जिरं व सुकं खोबरं (मिक्सरमध्ये एकत्र बारीक केलेले)
  • १ टेबलस्पून गोडा मसाला
  • १/४ टीस्पून लाल तिखट
  • थोडेसे आलं व १ हिरवी मिरची वाटून 
  • चवीनुसार मीठ

फोडणीकरिता :

  • २ टेबलस्पून तेल
  • ५-६ काळे मिरे
  • २-३ दालचिनीचे तुकडे
  • ३-४ लवंगा
  • १ तमालपत्र
  • १/४ टीस्पून मोहरी
  • १/४ टीस्पून जिरं
  • थोडीशी हळद व हिंग
  • ५-६ कडिपत्याची पानं

कृती:

१) एका पातेल्यात पुरणाचा कट, चिंचेचा घट्टसर कोळ, चिरलेला गूळ, पुरण, लाल तिखट, गोडा मसाला, वाटलेली आलं मिरची पेस्ट, जिरं व सुकं खोबरं ( मिक्सरमध्ये एकत्र बारीक केलेले) एकत्र करून मिश्रण मध्यम आंचेवर उकळत ठेवा. गरज वाटल्यास थोडे पाणी घाला. 

२) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरं, हळद, हिंग, काळे मिरे, दालचिनीचे तुकडे, लवंगा, तमालपत्र, कडिपत्याची पानं घालून फोडणी करा. तयार फोडणी मिश्रणात घाला. चवीनुसार मीठ घालून ५-६ मिनिटे आमटी चांगली उकळवा. थोडी घट्टसर झाल्यावर गॅस बंद करा व सर्व्ह करा.
(आपल्या आवडीनुसार तिखट गोडाचे प्रमाण घेऊ शकता.)




Comments

  1. Wow,very Interesting Reciepe. THOUGH We maharashtrian people know allthese dishesh . While Reading Reciepe,i can easily Imagine this Bowl . Gr8 , my all best Regards, Happy Holi

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts