रगडा पॅटीस
रगड्या करिता साहित्य:
१) ८-१० तास पांढरे वाटाणे भिजवा.
२) वाटाण्यात १/४ चमचा हळद, १/४ चमचा खायचा सोडा व बेताचे पाणी घालून कुकरमध्ये वाटाणे शिजवून घ्या.
३) एका कढईत तेल तापवून त्यात १/४ चमचा हळद , लाल तिखट व शिजवलेले वाटाणे घाला. चाट मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. उकळी आली की गॅस बंद करा. एका भांड्यात काढून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
पॅटीसमधील सारणाची कृती:
१) एका भांड्यात भिजवलेली चणाडाळ शिजवून घ्या.
शिजवलेली चणाडाळ चाळणीत उपसून ठेवा.
२) एका कढईत १/२ टेबलस्पून तेल तापवून त्यात
शिजवलेली चणाडाळ घालून १-२ मिनिटे परता. त्यात चिरलेला पुदिना, चिरलेली कोथिंबीर, आलं-मिरची पेस्ट ,गरम मसाला ,चाट मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
पॅटीस करण्याची कृती:
१) मिक्सरमध्ये ब्रेड स्लाईसचा चुरा करा. एका भांड्यात उकडलेले बटाटे सोलून मॅश करून घ्या. त्यात ब्रेडचा चुरा, आलं मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
२) बटाट्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी करून त्यात १ चमचा चणाडाळीचे तयार सारण भरून वाटी बंद करून त्याला चपटा आकार द्यावा. तयार पॅटीस तव्यावर तेल सोडून शॅलो फ्राय करा.
तिखट चटणीची कृती:
१) पुदिना व कोथिंबीर धुवून घ्या.
२) मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, लिंबाचा रस, शेंगदाणे/ डाळं (ऐच्छिक), हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा व मीठ चवीनुसार घालून बारीक वाटून घ्या.
३) तयार चटणी एका भांड्यात काढून घ्या.
गोड चटणीची कृती:
१) बिया काढलेला खजूर २ तास पाण्यात भिजवून घ्या किंवा कुकरमध्ये शिजवून घ्या.
२) मिक्सरच्या भांड्यात भिजवलेला/ शिजवलेला खजुर, चिरलेला गूळ , चिंचेचा कोळ, भाजलेले जिरं , लाल तिखट व चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्या. तयार चटणी गाळण्याने गाळून घ्या ( ऐच्छिक)
रगडा पॅटीस सर्व्ह करतांना:
एका खोलगट बाऊलमध्ये २ पॅटीस त्यावर आवडीनुसार तिखट चटणी, गोड चटणी व गरमागरम रगडा घालावा. बारीक चिरलेला कांदा व चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
- २५० ग्रॅम पांढरे वाटाणे
- १/४ टीस्पून खायचा सोडा
- १/२ टीस्पून हळद
- २ टीस्पून चाट मसाला
- १/२ चमचा लाल तिखट
- १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
- १ टेबलस्पून तेल
- मीठ चवीनुसार
- १/२ किलो उकडलेले बटाटे
- ३-४ ब्रेड स्लाईस
- १ टेबलस्पून आलं मिरची पेस्ट
- १/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १/२ टीस्पून हळद
- मीठ चवीनुसार
- पॅटीस शॅलो फ्राय करण्यासाठी तेल
- १ वाटी भिजवलेली चणाडाळ
- १ टेबलस्पून चिरलेला पुदिना
- १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
- १-२ टीस्पून आलं-मिरची पेस्ट
- १ टीस्पून गरम मसाला
- १ टीस्पून चाट मसाला
- मीठ चवीनुसार
- २ वाट्या निवडलेला पुदिना
- १ वाटी निवडलेली कोथिंबीर
- १ टेबलस्पून लिंबाचा रस
- १ टेबलस्पून शेंगदाणे/ डाळं (ऐच्छिक)
- ४-५ हिरव्या मिरच्या
- १ लहान आल्याचा तुकडा
- मीठ चवीनुसार
- १५-२० बिया काढलेला खजुर
- २ टेबलस्पून चिरलेला गूळ
- १/२ वाटी चिंचेचा कोळ
- १ टीस्पून भाजलेले जिरं
- १/२ टीस्पून लाल तिखट
- मीठ चवीनुसार
१) ८-१० तास पांढरे वाटाणे भिजवा.
२) वाटाण्यात १/४ चमचा हळद, १/४ चमचा खायचा सोडा व बेताचे पाणी घालून कुकरमध्ये वाटाणे शिजवून घ्या.
३) एका कढईत तेल तापवून त्यात १/४ चमचा हळद , लाल तिखट व शिजवलेले वाटाणे घाला. चाट मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. उकळी आली की गॅस बंद करा. एका भांड्यात काढून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
पॅटीसमधील सारणाची कृती:
१) एका भांड्यात भिजवलेली चणाडाळ शिजवून घ्या.
शिजवलेली चणाडाळ चाळणीत उपसून ठेवा.
२) एका कढईत १/२ टेबलस्पून तेल तापवून त्यात
शिजवलेली चणाडाळ घालून १-२ मिनिटे परता. त्यात चिरलेला पुदिना, चिरलेली कोथिंबीर, आलं-मिरची पेस्ट ,गरम मसाला ,चाट मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
पॅटीस करण्याची कृती:
१) मिक्सरमध्ये ब्रेड स्लाईसचा चुरा करा. एका भांड्यात उकडलेले बटाटे सोलून मॅश करून घ्या. त्यात ब्रेडचा चुरा, आलं मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
२) बटाट्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी करून त्यात १ चमचा चणाडाळीचे तयार सारण भरून वाटी बंद करून त्याला चपटा आकार द्यावा. तयार पॅटीस तव्यावर तेल सोडून शॅलो फ्राय करा.
तिखट चटणीची कृती:
१) पुदिना व कोथिंबीर धुवून घ्या.
२) मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, लिंबाचा रस, शेंगदाणे/ डाळं (ऐच्छिक), हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा व मीठ चवीनुसार घालून बारीक वाटून घ्या.
३) तयार चटणी एका भांड्यात काढून घ्या.
गोड चटणीची कृती:
१) बिया काढलेला खजूर २ तास पाण्यात भिजवून घ्या किंवा कुकरमध्ये शिजवून घ्या.
२) मिक्सरच्या भांड्यात भिजवलेला/ शिजवलेला खजुर, चिरलेला गूळ , चिंचेचा कोळ, भाजलेले जिरं , लाल तिखट व चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्या. तयार चटणी गाळण्याने गाळून घ्या ( ऐच्छिक)
रगडा पॅटीस सर्व्ह करतांना:
एका खोलगट बाऊलमध्ये २ पॅटीस त्यावर आवडीनुसार तिखट चटणी, गोड चटणी व गरमागरम रगडा घालावा. बारीक चिरलेला कांदा व चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
Mast g! Wachunch tondala Pani sutle..😄
ReplyDeleteThanks
ReplyDeleteKhupach savistar ani cchan receipy..🙂👍
ReplyDelete