पुरणपोळी

पुरणाकरिता साहित्य:
  • तीन ग्लास चणाडाळ
  • अडिच ग्लास चिरलेला गूळ
  • पाव ग्लास साखर
  • १/२ टीस्पून वेलची पावडर
  • थोडीशी जायफळ पूड

कव्हरकरिता साहित्य:

  • एक/दिड ग्लास मैदा
  • आवश्यकतेनुसार तेल
  • पाणी पीठ भिजवण्यासाठी
  • चिमुटभर मीठ

कृती:

१) चणाडाळीत पाणी घालून डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. कुकर गार झाल्यावर शिजवलेली चणाडाळ चाळणीत उपसून ठेवा.

२) 
एका पातेल्यात शिजवलेली चणाडाळ, गुळ व साखर घालून मिश्रण एकत्र करून पुरण शिजवून घ्या. शिजवलेले पुरण घट्टसर झाल्यावर गॅस बंद करा. (पुरण कडेने सुटू लागले की पुरण होत आले असे समजावे.) तयार पुरण पुरणयंत्रात वाटुन घ्या. पुरण वाटतांना त्यात वेलची पूड व थोडेसे जायफळ किसुन घालावे. 

३) एका भांड्यात मैदा व मीठ घालून मैैदा भिजवून घ्या. (मी मैदा सैलसर भिजवते) व १/२ वाटी तेल घाला. तुमच्या आवडीनुसार कणिक/मैदा भिजवून घ्या.

४) तयार पीठाचा लहान गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी करून त्यात पुरण भरून वाटी बंद करून त्याची हलक्या हाताने पोळी लाटा व दोन्ही बाजूंनी मध्यम आंचेवर तवा तापवून पोळ्या भाजून घ्या.

५) गरमागरम पोळी दुधा बरोबर किंवा साजूक तूपाबरोबर सर्व्ह करा. 





Comments

Post a Comment

Popular Posts