भरलेले टोमॅटो / Stuffed Tomato
भरलेले टोमॅटो करतांना टोमॅटो कडक व लालबुंद असावेत. टोमॅटोत भरण्यासाठी सारण व ग्रेव्ही करावी लागते. भरलेले टोमॅटो हे पोळी, फुलके व पराठ्यांबरोबर छान लागतात. भरलेले टोमॅटो करतांना बहुतेक सगळे साहित्य घरातच उपलब्ध असते. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
साहित्य:टोमॅटोत भरण्यासाठी सारण:
- ३ मध्यम आकाराचे टोमॅटो
- १/२ वाटी मटार
- १ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा
- २ हिरव्या मिरच्या व १/२"आलं
- १/२ वाटी खोवलेला नारळ
- थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ टीस्पून साखर
- चवीनुसार मीठ
- चिमुटभर सोडा
- १ टेबलस्पून तेल
ग्रेव्ही साठी:
- २ मोठे कांदे
- २-३ टोमॅटो
- ३-४ हिरव्या मिरच्या
- १" आलं
- ५-६ लसूण पाकळ्या
- ३-४ लवंगा
- १-२ मसाला वेलची
- १" दालचीनी
- १ टीस्पून धनेपुड
- १/२ टीस्पून जिरंपूड
- १ टीस्पून लाल तिखट
- १/४ टीस्पून हळद
- १ टीस्पून काॅर्नप्लोअर
- ३ टेबलस्पून तेल
- चवीनुसार मीठ
१) मटारचे दाणे मिक्सरमध्ये भरड वाटून घ्या व उकडलेला बटाटा मॅश करून घ्या.
२) आलं व हिरव्या मिरच्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करा.
३) एका कढईत तेल तापवून त्यात आलं व मिरची पेस्ट, भरड वाटलेले मटारचे दाणे व चिमुटभर सोडा घालून शिजवून घ्या. उकडून मॅश केलेला बटाटा, खोवलेला नारळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण १-२ मिनिटे परता. तयार मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.
४) कडक व लालबुंद टोमॅटो आडवे कापून त्याचे दोन भाग करून त्यातील बिया काढून एका बाजूला ठेवा.
५) तयार सारण टोमॅटो मध्ये व्यवस्थित भरून ठेवा.
६) एका छोट्या नाॅन-स्टीक पॅनमध्ये थोडेसे तेल तापवून त्यात भरलेले टोमॅटो ठेवा. झाकण ठेवून टोमॅटो ३-४ मिनिटे शिजवावे.
टोमॅटो ग्रेव्ही साठी:
१) कांदयाच्या फोडी करून मिक्सरमध्ये कांद्याची बारीक पेस्ट करून घ्या.
२) टोमॅटोच्या फोडी करून घ्या. बाजूला काढून ठेवलेल्या टोमॅटोच्या बीया व फोडी एकत्र करून मिक्सरमध्ये टोमॅटोची प्युरी करा.
३) हिरव्या मिरच्या, आलं, लसूण पाकळ्या, लवंगा, मसाला वेलची, दालचीनी, धनेपुड, जिरंपूड, लाल तिखट, हळद एकत्र करून मसाला वाटून घ्या.
४) एका पॅनमध्ये ३ टेबलस्पून तेल तापवून त्यात कांद्याची पेस्ट घालून परता. कांदा लालसर होईपर्यंत परता. कांदा लालसर झाल्यावर त्यात टोमॅटोची प्युरी घालून चांगले परतून घ्या. वाटलेला मसाला घालून परता. आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रणाला उकळी येऊ द्या. काॅर्नफ्लोअरची पेस्ट करून ग्रेव्हीमध्ये घालून ढवळा. चवीनुसार मीठ घाला. ग्रेव्ही आपल्या आवडीनुसार दाटसर ठेवा.
५) भरलेले टोमॅटो सर्व्ह करतांना भरलेल्या टोमॅटो वर ग्रेव्ही घालून पराठ्यां बरोबर सर्व्ह करा.
Stuffed Tomato
For making stuffed
tomatoes, the tomatoes should be hard and dark-red. We need to prepare
filling for Tomato-stuffing and also for gravy. Stuffed tomatoes go
well with Chapattis, Phoolkas or Parathas. Most of the ingredients
required for making stuffed tomatoes are available at home. If you like
the recipe, please do like, comment, share and subscribe.
Ingredients:
Tomato filling stuffing:
- 3 medium sized Tomatoes
- ½ cup Green-peas
- 1 medium sized boiled Potato
- 2 green Chillies and ½ "Ginger
- ½ cup grated Coconut
- Handful of finely chopped Coriander
leaves
- 1 tsp Sugar
- Salt to taste
- A pinch of Baking soda
- 1 tablespoon Oil
For Tomato gravy:
- 2 Onions (big sized)
- 2-3 medium sized Tomatoes
- 3-4 Green Chillies
- 1 " Ginger
- 5-6 Garlic cloves
- 3-4 Cloves
- 1-2 Black Cardamom ( Badi /kali
elaichi)
- 1 "Cinnamon
- 1 tsp Coriander powder
- ½ tsp Cumin powder
- 1 tsp Red Chili powder
- ¼ tsp Turmeric powder
- 1 tsp Corn flour
- 3 tbsp Oil
- Salt to taste
Method:
For Tomato Filling:
2) Make a paste of Ginger and Green Chilies in the mixer.
3) Heat Oil in a pan, add Ginger and Chili paste, coarsely ground Green-peas and a pinch of Baking soda and cook it for 1-2 minutes. Add boiled and mashed Potatoes, grated Coconut, finely chopped Coriander leaves, Sugar and Salt to taste and sauté it for 1-2 minutes. Remove the prepared filling in a bowl and keep it aside.
4) Cut the Tomatoes into two halves, remove the pulp and seeds and keep it aside.
5) Stuff the prepared filling in the tomatoes properly.
6) Heat a little oil in a small non-stick pan and put the Stuffed Tomatoes in it. Cover the pan and cook for 3-4 minutes or until cooked.
For Tomato Gravy:
1) Cut the
Onions into pieces and grind it in a mixer, and make a fine paste.
2) Cut
the Tomatoes into pieces. Combine the tomato pieces, tomato seeds and
pulp (kept aside while making the filling) in a mixer and make tomato
puree.
3) Grind
the Green Chilies, Ginger, Garlic Cloves, Black Cardamom ( Badi /kali elaichi), Cinnamon, Cloves, Coriander powder, Cumin powder, Red
Chili powder and Turmeric powder together and prepare masala paste.
4) Heat
3 tbsp oil in a pan and add onion paste. Sauté it until onion turns brown. When
the onion turns brown, add tomato puree and sauté it well. Add ground masala paste and sauté it again. Add water as required and let the mixture
boil. Add Corn flour paste to the gravy and stir it well. Add salt to
taste. Adjust the consistency as per your choice.
5) While
serving stuffed tomatoes, add gravy on stuffed tomatoes and serve hot with hot
Chapaties / Phoolkas / Parathas.
सर्व पदार्थ आणि त्यांची मांडणी एकदम उत्कृष्ट , मी आज पहिल्यांदा बघितले ..साधना ओक
ReplyDelete