ज्वारीच्या पीठाची उकडपेंडी/ Sorghum Upma




ज्वारीच्या पीठाची उकडपेंडी हा एक पारंपारिक, पौष्टिक व चविष्ट असा पदार्थ आहे. ज्वारी व्यतिरिक्त नाचणी किंवा गव्हाचे पीठ वापरूनही हा पदार्थ करू शकता. कमीत कमी वेळात तयार होणारा हा स्वादिष्ट पदार्थ घरात सहज उपलब्ध असणा-या साहित्यातही पटकन तयार होतो. लहानांना व मोठ्यांना आवडेल असा हा एक साधा व सोपा प्रकार आहे. ज्वारीच्या पीठाची उकडपेंडी कशी करायची याची रेसिपी देत आहे. आपल्याला ही रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्कीच करा.

साहित्य:
  • २ वाट्या ज्वारीचे पीठ
  • १ चिरलेला कांदा
  • ५-६ ठेचलेल्या लसूण पाकळ्या 
  • १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे 
  • १/२ वाटी ताक किंवा १/२ लिंबाचा रस
  • थोडीशी चिरलेली कोथिंबीर
  • थोडासा खोवलेला नारळ
  • १/२ वाटी शेंगदाणे
  • २-३ टेबलस्पून तेल
  • १/४ टीस्पून मोहरी
  • १/४ टीस्पून हळद
  • चिमुटभर हिंग

कृती:

१) एका कढईत ज्वारीचे पीठ ८-१० मिनिटे भाजून घ्यावे. थोडेसे लालसर भाजून झाले की, एका ताटलीत काढून ठेवावे.

२) कढईत २-३ टेबलस्पून तेल तापवून त्यात शेंगदाणे तळून बाजूला ठेवून द्या. तेलात मोहरी, हळद व चिमुटभर हिंग घालून फोडणी करून त्यात ठेचलेला लसुण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे व कांदा घालून परता. कांदा लालसर झाल्यावर त्यात २ ते २ १/२ वाट्या पाणी घालून उकळी येऊ द्या. त्यात १/२ वाटी ताक किंवा लिंबाचा रस घालून मिश्रण उकळवा. त्यात चवीनुसार मीठ घाला. मिश्रण उकळले की, त्यात भाजलेले ज्वारीचे पीठ घालून गुठळ्या होऊ नयेत यासाठी भरभर ढवळा. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ द्या.

३) एका डिशमध्ये तयार उकडपेंडीवर साजूक तूप, तळलेले शेंगदाणे, खोवलेला नारळ व कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.




# SORGHUM UPMA #

Sorghum Upma is a traditional, nutritious and tasty dish. In addition to sorghum, you can also use Ragi (Nachani) or Wheat flour. This delicious dish, which is prepared in the shortest possible time, is also easily prepared with the ingredients those are easily available at home. It's a simple and easy dish that the kid’s as well as adults would like. Here is a recipe for making Sorghum Upma. If you like this recipe, be sure to like, comment and subscribe.

INGRIDIENTS:

  • 2 cups Sorghum flour
  • 1 chopped Onion
  • 5-6  crushed  Garlic cloves
  • 1-2 pieces of Green chillies 
  • ½  cup Buttermilk or 1 tbsp Lemon juice
  • Handful of chopped Coriander
  • ¼ cup Grated coconut
  • ½ cup Peanuts
  • 2-3 tablespoons Oil
  • ¼ teaspoon Mustard seeds
  • ¼ teaspoon Turmeric powder
  • Pinch of Asafoetida
  • Salt to taste

METHOD:

1)   Roast Sorghum flour in a pan for 8-10 minutes. Once it is slightly reddish, remove it in a plate.

2)   Heat 2-3 tbsp oil in a pan and fry peanuts in it and keep it aside. Then add mustard seeds, turmeric powder and a pinch of asafoetida in the oil and after a few seconds add crushed garlic, green chillies and chopped onion. When onion turns brown, add 2 to 2 1/2 cups of water and bring to boil. Add 1/2 cup buttermilk or lemon juice and bring the mixture to  boil. Add salt as per taste. When the mixture boils, add roasted Sorghum flour and stir well to prevent lumps. Cover and steam it for 2-3 minutes or until cooked. 

3)   While serving Sorghum Upma, garnish it with pure ghee, fried peanuts, grated coconut, and coriander and serve hot.


Comments

Post a Comment

Popular Posts