पाकातल्या पु-या
- दिड वाटी रवा
- १/२ वाटी मैदा
- १/२ वाटी दही
- २-३ टेबलस्पून तेल
- दिड वाटी साखर
- १/४ टीस्पून वेलची पावडर
- थोडेसे केशर
- तळण्यासाठी तेल/तूप
१) रवा व मैदा एकत्र करून, त्यात २-३ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घाला. रवा व मैद्याचे मिश्रण एकत्र करून घ्या.
२) वरील मिश्रणात १/२ वाटी दही घालून मिश्रण एकत्र करून घ्या. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून कणिक भिजवा व चांगली मळून घ्या.
३) तयार कणकेचा गोळा १/२ ते १ तास झाकून ठेवा. नंतर कणिक पुन्हा चांगली मळून घ्या. छोटे छोटे गोळे करून घ्या.
४) एका भांड्यात साखर घेऊन त्यात १/२ - १ वाटी पाणी घालून एकतारी पाक करा. तयार पाकात वेलची पावडर व केशर घाला.
५) एका कढईत तेल/तूूूप तापवून त्यात एक एक पुरी लाटून, तळून, गरम पाकात टाका. दुसरी पुरी तळून पाकात टाका व पाकात टाकलेली पहिली पुरी काढून एका खोल ताटलीत काढून ठेवा.
६) सगळ्या पु-या एक-एक करून तळा व पाकातून काढून ठेवा. काढून ठेवताना त्या पु-यांमध्ये अतिरिक्त पाक रहाणार नाही याची खात्री करून घ्या.
७) तयार पाकातल्या पु-या सर्व्ह करा.
Khup cchan ani soppi receipe..🙂👍
ReplyDeleteThank you
Delete