खमंग काकडी


खमंग काकडी/काकडीची कोशिंबीर हे एक प्रसिद्ध महाराष्ट्रीयन सॅलड आहे. खमंग काकडी अतिशय चविष्ट व पौष्टिक असून याचा समावेश महाराष्ट्रीयन जेवणात केला जातो. वरण-भात, मसालेभात, पोळी या पदार्थाबरोबर आपण खमंग काकडी सर्व्ह करू शकतो. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असून त्यात बरेच व्हिटामिन्स व मिनरल्स आहेत. काकडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

साहित्य:

  • ३ मध्यम आकाराच्या काकड्या 
  • ३ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट 
  • १/२ चमचा साखर 
  • १ टेबलस्पून लिंबाचा रस 
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • मीठ चवीनुसार 

फोडणीकरिता:

  • १ टेबलस्पून तेल
  • १/८ चमचा मोहरी
  • थोडेसे जिरं
  • थोडीशी हळद
  • चिमुटभर हिंग
  • १ चिरलेली हिरवी मिरची

कृती:

१) काकडीची सालं काढून काकडी बारीक चिरून घ्या.

२) एका भांड्यात चिरलेली काकडी काढून घ्या. त्यात दाण्याचं कूट, साखर, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून घाला.

३) एका छोट्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरं, हळद, हिंग व हिरव्या मिरचीचेे तुकडे घालून फोडणी करा. तयार फोडणी काकडीच्या मिश्रणात घालून मिश्रण एकत्र करून घ्या.

४) तयार खमंग काकडी/काकडीची कोशिंबीर लगेचच सर्व्ह करा. 





Receipe  in English 

Khamang Kakadi/ kakadi chi Koshimbir/ Cucumber Salad :


Khamang Kakadi is famous salad of Maharastrian Cuisine. Khamang Kakadi is a delicious item and served as a side dish in Maharastrian thali. Cucumber has low calories but it contains many Vitamine's and Minerals and has lots of medicinal values. You can serve it with Masala Rice, Varan-Bhat (Dal-Rice) or Roti.

Ingredients:

  • 3 medium sized cucumbers
  • 3 Tbsp. peanunut powder
  • 1/2 tsp. Sugar
  • 1 Tbsp. Lemon juice 
  • Handful Finely chopped coriander 
  • Salt as per taste 

For tempering:



  • 1 tbsp Oil/ Pure ghee
  • 1/8 tsp Mustard seeds
  • 1/8 tsp Cumin seeds
  • 1 chooped green chilli 
  • 1 pinch of hing (Asafoetida )
  • 1 pinch turmeric powder 

Method:


1) Peel the Cucumbers & finely chop them.

2) For tempering heat a Oil/Pure ghee in a small pan. Add musturd seeds and as they begin to splutter add cumin seeds, a pinch of turmeric powder, chopped green chilli & a pinch of hing to it. Tempering is ready.

3) In a large bowl, add chopped Cucumber, Peanut powder, Sugar, chopped Coriander, Lemon juice & Salt as per taste. Add tempering to it. Mix it well. Serve Khamang Kakadi immediately.

Note:

For peanut powder dry roast the peanuts (as per your need) into a pan for 5-6 minutes & grind them coarsely into the mixer. If you want you can remove the skin of peanuts, by rubbing it in your palms. While making peanuts powder I never remove the peanuts skin. You can store peanuts powder for 15-20 days outside the freeze.

Comments

Popular Posts