साबुदाणा वडा

उपासाला चालणारा व सगळ्यांच्या आवडीचा साबुदाणा वडा. साबुदाणा वडा करतांना थोडे दही किंवा ताक वापरले तर साबुदाणा वडा हलका होतो. दही किंवा ताक कमी प्रमाणातच वापरावे जास्त झाल्यास साबुदाणा वडे तळतांना फुटतात किंवा विरघळतात पण दही किंवा ताक वापरले तर वडे छान होतात.

साहित्य:
  • २ वाट्या साबुदाणा
  • २-३ उकडलेले बटाटे
  • १ वाटी शेंगदाण्याचं कूट
  • ३-४ हिरव्या मिरच्या 
  • १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ चमचा दही 
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी रिफाईंड तेल किंवा तूप

कृती:

१) साबुदाणा ६-७ तास भिजवा .

२) उकडलेले बटाटे सोलून मॅश करून घ्या.

३) हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये भरड वाटा.

४) भिजवलेला साबुदाणा, बटाटे, शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा दही, वाटलेल्या हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून मळून घ्या.

५) मिश्रणाचे मध्यम आकाराचे चपटे गोळे तयार करून आपल्या आवडीनुसार रिफाईंड तेलात किंवा तुपात सोनेरी रंगावर तळून घ्या.

६) गरमागरम वडे दह्याबरोबर सर्व्ह करा.



Comments