शेवग्याच्या शेंगांचा कोळ

माझ्या सासूबाईंकडून शिकलेली रेसिपी देत आहे. आमटीला एक चांगला पर्याय.

साहित्य:

२-३ शेवग्याच्या शेंगा
१/२ वाटी चिंचेचा कोळ
२ चमचे चणाडाळीचे पीठ
फोडणीसाठी मोहरी, जिरं, हिंग, हळद
५-६ कडिपत्याची पानं
१-२ चमचा लाल तिखट
थोडासा गुळ
३ टेबलस्पून तेल
मीठ चवीनुसार

कृती:

१) शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घ्या. शेंगा थोड्याशा सोलून घ्या. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात शेंगांचे तुकडे थोडे मीठ घालून शिजवून घ्या.

२) चणाडाळीच्या पीठात थोडे पाणी घालून पेस्ट करा.

३) शिजवलेल्या शेंगांमधले पाणी काढू नका. त्यात चणाडाळीची पेस्ट, लाल तिखट, चिंचेचा कोळ, गुळ व चवीनुसार मीठ घालून पाणी उकळवा.

४) छोट्या कढईत तेल तापवून थोडसं जिरं, मोहरी, हिंग, हळद, कडिपत्याची पानं घालून फोडणी करा. तयार फोडणी शेंगांच्या मिश्रणावर घाला. मिश्रण उकळून थोडे दाटसर होऊ द्या.

५) गरमागरम शेंगांचा कोळ भाताबरोबर सर्व्ह करा.
आमटी ऐवजी चांगला पर्याय आहे.





Comments

Popular Posts