चटपटीत शंकरपाळे/ Chatpata Shankarpale

साहित्य:

  • १/४ किलो मैदा
  • १ चमचा लाल तिखट
  • १/४ चमचा हळद
  • १ चमचा ओवा 
  • १ चमचा चाट मसाला
  • १/२ चमचा जिरं पावडर
  • १/४ चमचा मिरपूड
  • मीठ चवीनुसार
  • २-३ चमचे तेलाचे मोहन
  • तळण्यासाठी तेल
  • पाणी पीठ भिजवण्यासाठी

कृती:

१) प्रथम एका परातीत मैदा चाळुन घ्या. त्यात लाल तिखट, हळद, ओवा, चाट मसाला, जिरं पावडर, मिरपूड व चवीनुसार मीठ घाला.

२) मैद्याच्या मिश्रणात २-३ चमचे गरम तेलाचे मोहन घालून एका चमच्याने एकत्र करा व पाणी घालून घट्ट भिजवून घ्या. १ छोटा चमचा तेल घालून कणिक चांगली मळून घ्या. १५-२० मिनिटे झाकून ठेवा.

४) तयार कणकेचे एकसारखे ३-४ गोळे करा व तयार गोळ्याची पातळ पोळी लाटा. पोळी लाटतांना तेल किंवा कोरडा मैदा वापरा. सुरीने किंवा कटरने चौकोनी शंकरपाळे कापून घ्या.

५) एका कढईत तेल तापवून मध्यम आंचेवर दोन्ही बाजूंनी शंकरपाळे सोनेरी रंगावर तळा.

६) गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. तयार शंकरपाळे २-३ आठवडे टिकतात. 

Chatpata Shankarpale :

Ingredients: 

  • 1/4 kg Maida/ All purpose flour
  • 1 tsp Red chilli powder
  • 1/4 tsp turmeric powder
  • 1 tsp ajwain
  • 1 tsp Chat masala
  • 1/2 tsp cumin powder
  • 1/4 tsp black pepper powder
  • Salt as per taste
  • 2-3  tsp oil 
  • Oil for frying
  • Water for kneading dough

Method :

1) In a mixing bowl mix Maida, Red chilli powder, turmeric powder, ajwain, Chat masala, cumin powder, black pepper powder & Salt as per taste. In a small pan heat 3-4 tsp oil and pour the hot oil in the flour mixture & mix it well with spoon.

2) Add some water to the flour mixture and make a stiff dough. Put 1 tsp oil and knead the dough again for 1 minute. Rest the dough for 15-20 minutes.

3) Make 3-4 equal portion of dough to roll the roties. With the help of roller roll all roties. You can use oil or dry flour while rolling the shankarpali and cut the same with knife or cutter in diamond or square shape.

4) Heat the oil in a pan & deep fry the shankarpali on medium flame till it turns golden brown. Fry both the sides of shankarpali.

5) When it cools down store it in an airtight container. Shelf life of shankarpali is 2-3 weeks.


Comments

Post a Comment

Popular Posts