मिक्स डाळींचा उत्तपा
वेगवेगळ्या डाळी भिजवून केलेला पौष्टिक असा मिक्स डाळींचा उत्तप्पा. २-३ तास डाळी भिजवून करता येईल. वाटलेल्या तयार पीठाचे डोसे पण करता येतात आणि तयार पीठ ८-९ तास आंबवले तर मिक्स डाळींचा ढोकळा पण उत्तम होतो.
मिक्स डाळींचा उत्तप्पा:
साहित्य:
१) वरील सगळ्या डाळी व इडली रवा एकत्र करून धुवून २-३ तास भिजवा व मिक्सरमध्ये बारीक वाटा. (आवडत असल्यास त्यात आलं व मिरचीची पेस्ट घाला) चवीनुसार मीठ घालून एकत्र करा.
२) नाॅन-स्टीकचा तवा तापवून त्यात मिनी उत्तप्पा घाला त्यावर बारीक चिरलेला पालक, किसलेले गाजर, मक्याचे दाणे घाला. थोडे तेल सोडून उत्तप्पा दुस-या बाजूने शेका व चटणी बरोबर सर्व्ह करा. आवडत असल्यास किसलेले चीझ घाला.
मिक्स डाळींचा डोसा :
फक्त पालक,गाजर व मक्याचे दाणे सोडून इतर साहित्य वरील प्रमाणेच घ्यावे. मिक्स डाळींचे डोसे करतांना पीठामध्ये जरुरीनुसार पाणी व मीठ घालून पीठ डोश्याच्या पीठाप्रमाणे पातळसर करून नॉन-स्टिक च्या तव्यावर डोसे करा. तयार गरम-गरम डोसे चटणी बरोबर सर्व्ह करा.
मिक्स डाळींचा ढोकळा:
फक्त पालक,गाजर व मक्याचे दाणे सोडून इतर साहित्य वरील प्रमाणेच घ्यावे. मिक्स डाळींचा ढोकळा करतांना वाटलेले पीठ ८-९ तास झाकून ठेवावे. ढोकळा करतांना त्यात आलं व मिरची पेस्ट, १ चमचा लिंबूरस व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. एका थाळीत तेल लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये ( शिटी न लावता) १२-१५ मिनिटे वाफवावे. तयार ढोकळ्यावर जिरं, मोहरी व हिंगाची फोडणी द्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम-गरम ढोकळा चटणी किंवा शेझवान साॅस बरोबर सर्व्ह करा.
मिक्स डाळींचे आप्पे:
मिक्स डाळींचे आप्पे करतांना सगळ्या डाळी व इडली रवा भिजवून बारीक वाटा. वाटलेले पीठ ७-८ तास आंबवत ठेवावे. नंतर त्यात आलं व मिरचीची पेस्ट, मीठ व १ टीस्पून इनो घालून मिश्रण एकत्र करून घ्या. आवडत असल्यास त्यात मक्याचे दाणे, चिरलेले गाजर किंवा मटार सुद्धा घालू शकता. आप्पे-पात्र मध्यम आंचेवर तापत ठेवावे. त्यात थोडे तेल सोडून १-१ चमचा मिश्रण घालावे व त्यावर १-२ मिनिटे झाकण ठेवावे. दोन्ही बाजूंनी थोडे थोडे तेल सोडून आप्पे शिजवावे. गरम-गरम आप्पे टोमॅटो केचप किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे.
*(नॉन स्टिकचे आप्पे पात्र असेल तर ते वापरावे).
रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.
मिक्स डाळींचा उत्तप्पा:
साहित्य:
- १ वाटी चणाडाळ
- १ वाटी उडिदडाळ
- १ वाटी तूरडाळ
- १ वाटी मूगडाळ
- १ वाटी मसूरडाळ
- १ वाटी इडली रवा
- १ वाटी जाडे पोहे
- १ वाटी बारीक चिरलेला पालक
- १ वाटी किसलेले गाजर
- १ वाटी मक्याचे दाणे
- तेल आवश्यकतेनुसार
- मीठ चवीनुसार
कृती:
२) नाॅन-स्टीकचा तवा तापवून त्यात मिनी उत्तप्पा घाला त्यावर बारीक चिरलेला पालक, किसलेले गाजर, मक्याचे दाणे घाला. थोडे तेल सोडून उत्तप्पा दुस-या बाजूने शेका व चटणी बरोबर सर्व्ह करा. आवडत असल्यास किसलेले चीझ घाला.
मिक्स डाळींचा डोसा :
फक्त पालक,गाजर व मक्याचे दाणे सोडून इतर साहित्य वरील प्रमाणेच घ्यावे. मिक्स डाळींचे डोसे करतांना पीठामध्ये जरुरीनुसार पाणी व मीठ घालून पीठ डोश्याच्या पीठाप्रमाणे पातळसर करून नॉन-स्टिक च्या तव्यावर डोसे करा. तयार गरम-गरम डोसे चटणी बरोबर सर्व्ह करा.
मिक्स डाळींचा ढोकळा:
फक्त पालक,गाजर व मक्याचे दाणे सोडून इतर साहित्य वरील प्रमाणेच घ्यावे. मिक्स डाळींचा ढोकळा करतांना वाटलेले पीठ ८-९ तास झाकून ठेवावे. ढोकळा करतांना त्यात आलं व मिरची पेस्ट, १ चमचा लिंबूरस व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. एका थाळीत तेल लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये ( शिटी न लावता) १२-१५ मिनिटे वाफवावे. तयार ढोकळ्यावर जिरं, मोहरी व हिंगाची फोडणी द्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम-गरम ढोकळा चटणी किंवा शेझवान साॅस बरोबर सर्व्ह करा.
मिक्स डाळींचे आप्पे:
मिक्स डाळींचे आप्पे करतांना सगळ्या डाळी व इडली रवा भिजवून बारीक वाटा. वाटलेले पीठ ७-८ तास आंबवत ठेवावे. नंतर त्यात आलं व मिरचीची पेस्ट, मीठ व १ टीस्पून इनो घालून मिश्रण एकत्र करून घ्या. आवडत असल्यास त्यात मक्याचे दाणे, चिरलेले गाजर किंवा मटार सुद्धा घालू शकता. आप्पे-पात्र मध्यम आंचेवर तापत ठेवावे. त्यात थोडे तेल सोडून १-१ चमचा मिश्रण घालावे व त्यावर १-२ मिनिटे झाकण ठेवावे. दोन्ही बाजूंनी थोडे थोडे तेल सोडून आप्पे शिजवावे. गरम-गरम आप्पे टोमॅटो केचप किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे.
*(नॉन स्टिकचे आप्पे पात्र असेल तर ते वापरावे).
रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.
# Mix Dal Uttappam#
Ingredients:
- 1 bowl Bengal Gram dal / Chana dal
- 1 bowl Black Gram Dal/ Udid dal
- 1 bowl Red Lentil Dal/ Masoor Dal
- 1 bowl Pigeon Gram/ tuvar Dal
- 1 bowl Green Gram Dal/ Moong Dal
- 1 bowl Flattened Rice
- 1 bowl Idli Rava
- 1 bowl chopped Spinach
- 1 bowl grated Carrot
- 1 bowl Corn
- Oil for frying
- Salt as per taste
Method:
1) Wash & soak all Dals, Flattened Rice & Idli Rava for 2-3 hours.
Drain all water & grind it into a smooth paste. Add little water while
grinding to adjust the consistency like Idli batter. (You can add Ginger Garlic
paste). Add salt as per taste. Now our
batter is ready.
2) Heat a non-stick tava/gridle and add laddalful of batter on it. Spread
into a small circular shape. Put chopped Spinach, grated Carrot & Corn on
it. Smear some oil on the top & edges of Uttapam. Cook both side & serve
it with chutney.
# Mix Dal Dosa #
Above batter (without fermentation) is also used to make Dosa. Add some water and salt as per taste in the batter, and adjust the consistency. Heat Non stick Dosa tava/Griddle on medium flam. Pour a laddleful batter on tava and spread batter evenly in circular shape and make dosa. Serve delicious Dosa with chutney.
# Mix Dal Dhokala#
Leave Mix Dal Uttapaam batter aside to ferment for 8-9 hours for preparing Dhokala. When batter get fermented, add Ginger-Garlic paste, 1 tsp Lemon juice & Salt as per taste. Mix it well. Grease the Dhokala thali & place it in the cooker without whistle. Steam it for 12-15 minutes. When it gets cooled down, cut into squares. Heat some Oil into a small pan, add Mustard seeds, a pinch of a Asafoetida, chopped Green Chilies & Curry Leaves. Pour the tempering on Dhokala. Garnish it with chopped Coriander leaves & grated Coconut. Serve with chutney.
Comments
Post a Comment