मटार पॅटीस
साहित्य:
कृती:
१) उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. त्यात हळद व चवीनुसार मीठ घाला. त्यात ब्रेड क्रम्पस घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
२) मटार मिक्सरमध्ये भरड वाटून घ्या. एका कढईत २ चमचे तेल तापवून त्यात वाटलेले मटार कोरडे होईपर्यंत परता. मटार कोमट झाल्यावर त्यात खोवलेला नारळ, आलं-मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला व चवीनुसार मीठ घाला.
३) बटाट्याच्या मिश्रणाचा वाटी करून त्यात मटाराचे सारण भरून पॅटीस करून तांदूळाचे पीठात घोळवून नाॅन-स्टीक च्या तव्यावर तेल सोडून मटार पॅटीस शॅलो फ्राय करा.
मटार पॅटीस चटणी/ साॅस बरोबर सर्व्ह करा.
- २ वाट्या मटार
- ६-७ उकडलेले बटाटे
- १ वाटी खोवलेला नारळ
- १ टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट
- १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर
- १ चमचा चाट मसाला
- १/२ वाटी ब्रेड क्रम्पस
- १/२ वाटी तांदुळाचे पीठ/ काॅर्नप्लोअर
- १/२ चमचा हळद
- तेल आवश्यकतेनुसार
- मीठ चवीनुसार
कृती:
१) उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. त्यात हळद व चवीनुसार मीठ घाला. त्यात ब्रेड क्रम्पस घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
२) मटार मिक्सरमध्ये भरड वाटून घ्या. एका कढईत २ चमचे तेल तापवून त्यात वाटलेले मटार कोरडे होईपर्यंत परता. मटार कोमट झाल्यावर त्यात खोवलेला नारळ, आलं-मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला व चवीनुसार मीठ घाला.
३) बटाट्याच्या मिश्रणाचा वाटी करून त्यात मटाराचे सारण भरून पॅटीस करून तांदूळाचे पीठात घोळवून नाॅन-स्टीक च्या तव्यावर तेल सोडून मटार पॅटीस शॅलो फ्राय करा.
मटार पॅटीस चटणी/ साॅस बरोबर सर्व्ह करा.
मस्तच..
ReplyDeleteThanku
ReplyDelete