Vegetable Wrap

साहित्य:
कव्हरकरिता:
  • २ वाट्या गव्हाचे पीठ
  • थोडेसे मीठ
  • १ टीस्पून तेल
  • पाणी पीठ भिजवण्यासाठी
सारणासाठी:
  • १/४ वाटी उभा चिरलेला कोबी
  • १/४ वाटी उभी चिरलेली सिमला मिरची
  • १/४ वाटी उभी चिरलेली फरसबी
  • १/४ वाटी उभे चिरलेले गाजर
  • १/४ वाटी बारीक चिरलेला कांदा
  • १/४ वाटी उकडलेले मक्याचे दाणे
  • १/४ वाटी बारीक चिरलेली कांदा पात
  • १/२ टीस्पून ओरिगॅनो
  • १/४ टीस्पून मिरपूड
  • १ टीस्पून चिली फ्लेक्स
  • २ टीस्पून सोया साॅस
  • १ टेबलस्पून तेल
  • मीठ चवीनुसार
  • बटर आवश्यकतेनुसार 

पुदिन्याची चटणी

  • २ वाट्या निवडलेला पुदिन्याची, १ वाटी  निवडलेली कोथिंबीर , ३-४ हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, थोडेसं आलं,मुठभर शेंगदाणे, १/२ लिंबाचा रस, मीठ चवीनुसार
  • चटणी करिता दिलेले  साहित्य एकत्र करून जरुरीनुसार पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून, चटणी करून घ्या.

कृती:

१) गव्हाच्या पीठात थोडे मीठ व तेल  घालून कणिक भिजवून घ्या. तयार कणकेचे लहान गोळे करून पोळ्या करून, तव्यावर भाजून घ्या. 

२) एका कढईत तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता.  त्यात चिरलेले गाजर, सिमला मिरची, फरसबी घालून २-३ मिनिटे परता. उकडलेले मक्याचे दाणे व कोबी घालून १-२ मिनिटे पुन्हा परता.

३) तयार भाजीमध्ये  ओरिगॅनो, मिरपूड, चिली फ्लेक्स, सोया साॅस व चवीनुसार मीठ घालून परता . चिरलेली कांदा पात घालून भाजी ढवळा व गॅस बंद करा. भाजी एका भांड्यात काढून घ्या .

४) तवा तापत ठेवा.  एक पोळी घ्या. एका बाजूला बटर लावून पोळी तव्यावर टाका  वरील बाजूस पुदिन्याची चटणी लावा. तयार भाजी पोळीवर ठेवून पोळी गुंडाळून घ्या. तयार Veg. Wrap टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.






Comments

Popular Posts