आळूची पातळ भाजी
आळूची पातळ भाजी किंवा आळूचे फतफतं. प्रत्येक लग्नकार्यात आवर्जून केली जाणारी महाराष्ट्राची पारंपारिक रेसिपी. भाजीकरता व आळूवडीसाठी बाजारात दोन प्रकारची आळूची पानं मिळतात. पावसाळ्यात आळूची पानं मुबलक प्रमाणात मिळतात. आळूच्या पानात व देठात भरपूर प्रमाणात लोह असल्याने ही भाजी खाणे फायदेशीर आहे.
साहित्य:
फोडणीसाठी:
१) आळूच्या देठावरील सालं काढून घ्या. आळूची पानं व देठं धुवून बारीक चिरून घ्या. एका भांड्यात २ टीस्पून तेल तापवून त्यात चिरलेली आळूची पानं व देठं घालून परतून घ्या. त्यात भिजवलेले शेंगदाणे,चणाडाळ हिरव्या मिरच्यांचे तुकडे व १ वाटी पाणी घाला. एका कुकरच्या डब्यात भाजी काढून कुकरमध्ये ३ शिट्या करून शिजवून घ्या.
२) कुकर गार झाल्यावर शिजवलेली भाजी काढून घ्या. त्यातील पाणी एका भांड्यात काढून घ्या. भाजीमध्ये चिंचेचा कोळ, चिरलेला गूळ, खोवलेला नारळ, चणाडाळीचे पीठ, लाल तिखट, गोडा मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. भांड्यात काढून ठेवलेले पाणी घालून भाजी ढवळून घ्यावी आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून भाजी ढवळून मध्यम आंचेवर उकळत ठेवा.
३) एका छोट्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी, मेथी दाणे, लाल मिरचीचे तुकडे, कडिपत्याची पानं व हिंग घालून फोडणी करा. तयार फोडणी भाजीत घाला.
४) तयार भाजी गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करा.
साहित्य:
- ७-८ आळूची पानं (भाजीची)
- १/४ वाटी भिजवलेली चणाडाळ
- १/४ वाटी भिजवलेले शेंगदाणे
- २ टेबलस्पून चिंचेचा कोळ
- १ टेबलस्पून चिरलेला गूळ
- १/४ वाटी खोवलेला नारळ
- १ -२ हिरवी मिरच्या( ऐच्छिक)
- २ टेबलस्पून चणाडाळीचे पीठ
- १/२ टीस्पून लाल तिखट
- १/४ टीस्पून हळद
- २ टीस्पून गोडा मसाला
फोडणीसाठी:
- ३ टेबलस्पून तेल
- ७-८ मेथीदाणे
- २-३ सुक्या लाल मिरच्या
- १/४ चमचा मोहरी
- थोडासा हिंग
- ५-६ कडिपत्याची पानं
कृती :
१) आळूच्या देठावरील सालं काढून घ्या. आळूची पानं व देठं धुवून बारीक चिरून घ्या. एका भांड्यात २ टीस्पून तेल तापवून त्यात चिरलेली आळूची पानं व देठं घालून परतून घ्या. त्यात भिजवलेले शेंगदाणे,चणाडाळ हिरव्या मिरच्यांचे तुकडे व १ वाटी पाणी घाला. एका कुकरच्या डब्यात भाजी काढून कुकरमध्ये ३ शिट्या करून शिजवून घ्या.
२) कुकर गार झाल्यावर शिजवलेली भाजी काढून घ्या. त्यातील पाणी एका भांड्यात काढून घ्या. भाजीमध्ये चिंचेचा कोळ, चिरलेला गूळ, खोवलेला नारळ, चणाडाळीचे पीठ, लाल तिखट, गोडा मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. भांड्यात काढून ठेवलेले पाणी घालून भाजी ढवळून घ्यावी आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून भाजी ढवळून मध्यम आंचेवर उकळत ठेवा.
३) एका छोट्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी, मेथी दाणे, लाल मिरचीचे तुकडे, कडिपत्याची पानं व हिंग घालून फोडणी करा. तयार फोडणी भाजीत घाला.
४) तयार भाजी गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करा.
Comments
Post a Comment