व्हेज. शेझवान फ्राईड राईस
व्हेज. शेझवान फ्राईड राईस करतांना जे घरात सहज उपलब्ध असेल ते पदार्थ वापरून मी फ्राईड राईस करते. मक्याचे दाणे, कांदा पात असेल तर वापरते. पटकन तयार होणारी व घरात सगळ्यांच्या आवडीची रेसिपी.
साहित्य:
कृती :
१) प्रथम एका भांड्यात मोकळा भात शिजवून घ्या.
२) एका नाॅन-स्टीक पॅन मध्ये तेल तापवून त्यात चिरलेला लसूण व आलं (ऐच्छिक),चिरलेला कांदा , सिमला मिरची, गाजर घालून २-३ मिनिटे परतून घ्या. त्यात सोया साॅस, शेझवान साॅस, लाल तिखट, तयार शेझवान फ्राईड राईस मसाला घालून परता. तयार भात, चिरलेला कोबी व चवीनुसार मीठ घालून भात एकत्र करून २-३ मिनिटे परतून घ्या. आवडीनुसार चिरलेली कांदा पात बारीक चिरून घाला.
साहित्य:
- १ वाटी बासमती तांदूळ
- २-३ लसुण पाकळ्या व थोडेसे आलं (ऐच्छिक )
- १/४ वाटी उभी चिरलेली सिमला मिरची
- १/४ वाटी उभी चिरलेले गाजर
- १/४ वाटी उभी चिरलेला कोबी
- १/४ वाटी बारीक चिरलेला कांदा
- १/४ वाटी बारीक चिरलेली कांदा पात ( ऐच्छिक)
- २ टेबलस्पून तेल
- १ टेबलस्पून शेझवान साॅस
- १ टीस्पून सोया साॅस
- १/२ टीस्पून लाल तिखट
- १ टेबलस्पून तयार शेझवान फ्राईड राईस मसाला
- चवीनुसार मीठ
कृती :
१) प्रथम एका भांड्यात मोकळा भात शिजवून घ्या.
२) एका नाॅन-स्टीक पॅन मध्ये तेल तापवून त्यात चिरलेला लसूण व आलं (ऐच्छिक),चिरलेला कांदा , सिमला मिरची, गाजर घालून २-३ मिनिटे परतून घ्या. त्यात सोया साॅस, शेझवान साॅस, लाल तिखट, तयार शेझवान फ्राईड राईस मसाला घालून परता. तयार भात, चिरलेला कोबी व चवीनुसार मीठ घालून भात एकत्र करून २-३ मिनिटे परतून घ्या. आवडीनुसार चिरलेली कांदा पात बारीक चिरून घाला.
Comments
Post a Comment