शेवग्याच्या मसाला शेंगा

साहित्य:
  • ३-४ शेवग्याच्या शेंगा तुकडे करून
  • १ वाटी खरवडलेला ओला नारळ
  • १ वाटी बारीक चिरलेला कांदा
  • १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ चमचा लाल तिखट 
  • १ चमचा धने पावडर
  • २ टी स्पून गोडा मसाला 
  • १ टी स्पून साखर
  • हिंग, मोहरी, हळद, तेल फोडणीसाठी 
  • मीठ चवीनुसार
कृती:

१) शेंगांचे तुकडे वरील सालं काढून शेंगा गरम पाण्यात शिजवून घ्या.

२) एका कढईत १/४ वाटी तेल तापवा. तेल तापले की, त्यात थोडी मोहरी, हिंग, हळद घाला. त्यात चिरलेला कांदा परतून घ्या. नंतर त्यात खरवडलेला नारळ, चिरलेली कोथिंबीर, गोडा मसाला, लाल तिखट, धने पावडर, मीठ, साखर घालून परता.

३) शिजवलेल्या शेंगांचे तुकडे घालून भाजी हलक्या हाताने ढवळा व मध्यम आंचेवर २-३ मिनिटे झाकण ठेवून भाजी वाफवा.

४) गरम-गरम पोळी बरोबर सर्व्ह करा.


( तुमच्या आवडीप्रमाणे तेल, तिखट-मीठाचे प्रमाण वाढवा)



Comments

Post a Comment

Popular Posts