लाल भोपळ्याचे भरीत
साहित्य:
१) लाल भोपळ्याची सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करून कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजवतांना बेताने पाणी घाला.
२) शिजलेल्या भोपळ्यातील पाणी काढून टाकावे. एका भांड्यात भोपळा गार झाल्यावर मॅश करून घ्या.
३) त्यात दही, साखर, शेंगदाण्याचं कुट, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घाला. साजूक तूप तापवून त्यात जिरं व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी करा. तयार फोडणी भोपळ्याच्या मिश्रणात घाला. मिश्रण एकत्र करा व सर्व्ह करा.
- २५० ग्रॅम लाल भोपळा
- १ वाटी दही
- १ चमचा साखर
- १ हिरव्या मिरचीचे तुकडे
- २ चमचे शेंगदाण्याचे कुट
- १ चमचा साजुक तुप
- १/२ चमचा जिरं
- थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
१) लाल भोपळ्याची सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करून कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजवतांना बेताने पाणी घाला.
२) शिजलेल्या भोपळ्यातील पाणी काढून टाकावे. एका भांड्यात भोपळा गार झाल्यावर मॅश करून घ्या.
३) त्यात दही, साखर, शेंगदाण्याचं कुट, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घाला. साजूक तूप तापवून त्यात जिरं व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी करा. तयार फोडणी भोपळ्याच्या मिश्रणात घाला. मिश्रण एकत्र करा व सर्व्ह करा.
Comments
Post a Comment