कारल्याचे लोणचं

साहित्य:
  • १ मध्यम आकाराचे कारले
  • २-३ ओल्या लाल मिरच्यांचे तुकडे
  • २ टेबलस्पून मोहरी
  • १/२ चमचा हळद
  • ४-५ मेथी दाणे
  • थोडासा हिंग
  • १/२ वाटी तेल
  • २ टेबलस्पून लिंबू रस
  • मीठ चवीनुसार
कृती: 

१) प्रथम कारले मधोमध चिरून त्याचे पातळ काप करून त्यात चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा.

२) तेल तापवून त्यात मेथी दाणे तळून घ्या. मिक्सरमध्ये मेथी दाणे, मोहरी, हळद व हिंग घालून बारीक वाटून लोणच्याचा मसाला करून घ्या.

३) एका छोट्या कढईत तेल तापवून गार करा.

४) तयार मसाला, लाल मिरच्यांचे तुकडे,लिंबाचा रस व तापवून गार केलेले तेल चिरलेल्या कारल्यात घालून मिश्रण एकत्र करून घ्या.


२-३ दिवसात लोणचं मुरते. तयार लोणचं फ्रिझमध्ये बरेच दिवस टिकते. ३-४ टेबलस्पून कैरीच्या लोणच्याचा तयार मसाला वापरला तरी चालेल.


Comments

Popular Posts