तिळाच्या वड्या

महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या सण साजरा केला जातो. दरवर्षी जानेवारी महिन्यात मकरसंक्रांत असते या महिन्यात थंडी असल्याने उष्ण पदार्थ खाण्याचा प्रघात आहे. तीळ व गुळ दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने यांचा वापर करून प्रत्येक घरात तिळाचे लाडु, तिळाच्या वड्या, गुळाच्या पोळयांसारखे पदार्थ करण्याची पद्धत आहे. संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत सवाष्ण बायका हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. लहान मुलांचे बोरनहाण/ तीळवण याचवेळी साजरी होते. अश्या या सणाचे स्वागत मी 'तिळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणून करते व सगळ्यांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा देते. त्या निमित्ताने आज तिळाच्या वड्यांची रेसिपी देत आहे. 

साहित्य:
  • भाजलेल्या तीळाचे कुट २ वाट्या
  • भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट १ वाटी
  • साखर अडीच वाट्या
  • थोडी वेलची पावडर
  • १/४ वाटी सुक्या खोबऱ्याचा किस
  • पाणी
कृती:

१) तिळाचे कुट व शेंगदाण्याचे कुट एकत्र करा.

२) एका कढई/ पातेलीत साखर घ्या. साखर बुडेल इतके पाणी घालुन उकळत ठेवा.

३) साखरेचा एकतारी पेक्षा थोडा जास्त पाक करा. त्यात तिळाचे व शेंगदाण्याचे कुट, थोडी वेलची पावडर घाला. एकत्र करा जरा घट्ट झाले की, तूप लावलेल्या ट्रे मध्ये थापा. वरून सुक्या खोबऱ्याचा किस घाला. थोडेसे गार झाल्यावर वड्या पाडा.



Comments

Popular Posts