नाचणीचे लाडू

लहान मोठ्यांना अतिशय पौष्टिक व भरपूर कॅल्शियम असणारी नाचणी.  नाचणी वापरून नाचणीची खीर, भाकरी तसेच लाडू सुध्दा केले जातात. नाचणीचे लाडू करण्याची रेसिपी देत आहे. 

साहित्य:
  • १/४ किलो नाचणीचे पीठ 
  • २ वाट्या पीठीसाखर (कमी-जास्त आवडीनुसार)
  • साजुक तुप आवश्यकतेनुसार
  • वेलची पावडर 
  • काजुचे तुकडे
कृती

 १) एका कढईत पाऊण वाटी तुप घाला. त्यात नाचणीचे पीठ  घालुन बेसन लाडवाप्रमाणे पीठ भाजा. घरभर खमंग वास सुटला पाहिजे.(आवश्यकता वाटल्यास अजून थोडे तूप घाला.)

२) पीठ भाजून झाले की, गॅस बंद करून भाजलेल्या पीठात १/४ वाटी दुध घालून मिश्रण ढवळा. पीठ कोमट झाल्यावर (आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात) पीठीसाखर, वेलचीची पावडर व काजुचे तुकडे घालुन मिश्रण एकत्र करून थोडे मळा. 

३) तयार मिश्रणाचे लाडू करा व त्यावर काजूचा तुकडा लावा.


रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की द्या.

Comments