शिंगाड्याचे लाडू


साहित्य:
  • २-३ वाट्या शिंगाड्याचे पीठ
  • १ वाटी शेंगदाण्याचं कूट
  • १ ते दिड वाटी साजूक तूप
  • दिड वाटी पीठीसाखर
  • १/४ चमचा वेलची पूड
  • १/४ कप दूध
  • ८-१० काजूचे तुकडे
कृती:

१) एका कढईत पाऊण वाटी साजूक तूप व शिंगाड्याचे पीठ घेऊन मध्यम आंचेवर शिंगाड्याचे पीठ खमंग भाजावे. आवश्यकता वाटल्यास पुन्हा थोडे तूप घाला. पीठ भाजून झाल्यावर त्यात शेंगदाण्याचं कूट घालून १-२ मिनिटे पीठ भाजावे. भाजलेल्या पीठात वेलची पूड घाला.

२) गॅस बंद करून भाजून झालेल्या पीठावर १/४ कप दूध घालून पीठ चांगले ढवळा.

३) भाजलेले पीठ कोमट झाल्यावर त्यात पीठीसाखर व काजूचे तुकडे घाला. 

४) तयार पीठ चांगले मळा व लाडू वळा. पीठ कोरडे वाटल्यास त्यात १ चमचा साजूक तूप घालून लाडू वळा.
(तयार साहित्यात १०-१२ मोठे लाडू होतात.)

( आपल्या आवडीनुसार साजूक तूप व पीठीसाखर कमी-जास्त प्रमाणात वापरा.)



Comments

Popular Posts